Satara NCP : शरद पवारांचे साताऱ्यात जंगी स्वागत; युवकांकडून पुष्पवृष्टी आणि घोषणाबाजी

Sharad Pawar राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज सायंकाळी त्यांचे निपाणीहून दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी साताऱ्यात प्रथमच आगमन झाले.
Sharad Pawar in Satara
Sharad Pawar in Satarasarkarnama

Sharad Pawar News : देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षाचा विजय असो, अशी घोषणाबाजी आणि पुष्पवृष्टी करत राष्ट्रवादी युवक, युवती सेल व जिल्हा कार्यकारिणीने शरद पवार Sharad Pawar यांचे जंगी स्वागत केले. यावेळी विश्रामगृहापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून राष्ट्रवादीच्या युवकांनी श्री. पवार यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज सायंकाळी त्यांचे निपाणीहून दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी साताऱ्यात प्रथमच आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी, युवती सेल, महिला आघाडी, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सैनिक स्कुलच्या मैदानाच्या गेटपासून ते विश्रामगृहापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभे होते.

त्यांनी शरद पवार यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करत स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो.., पवार साहब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..., राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो.., महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार... शरद पवार.., अशी घोषणाबाजी केली. शासकिय विश्रामगृहात श्री. पवार यांच्या गाड्यांचा ताफा आल्यानंतर एकच गर्दी झाली होती.

Sharad Pawar in Satara
Sharad Pawar यांनी पुन्हा जिंकली कार्यकर्त्यांची मने, बघा नेमकं काय घडले ? | NCP | Sarkarnama

यावेळी युवती सेल व महिला आघाडीच्यावतीने श्री. पवार यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर श्री. पवार हे शासकिय विश्रामगृहातील दालनात दाखल झाले. यावेळी श्री. पवार यांना भेटण्यासाठी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी व महिलांची मोठी गर्दी झाली होती. सर्वजण आपल्या नेत्याला पाहून आनंदाने भारावून गेले होते.

Sharad Pawar in Satara
Karnataka Election 2023 : एका शब्दामुळे सोनिया गांधी अडचणीत ;BJP ची निवडणूक आयोगाकडे तक्रार ; त्या म्हणाल्या..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com