Sharad Pawar On Prithviraj Chavan: शरद पवारांचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला.. ते ए, बी, सी की डी आहेत ते एकदा तपासावे....

Sharad Pawar News: कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी श्री. पवार साताऱ्यात आले होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Prithviraj Chavan, Sharad Pawar
Prithviraj Chavan, Sharad Pawarsarkarnama

Satara NCP News : पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांचे त्यांच्या पक्षात काय स्थान आहे, असा प्रश्न करुन ते ए, बी, सी की डी आहेत ते एकदा तपासावे. मग राष्ट्रवादीवर टीका करावी, अशी सडेतोड टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार Sharad Pawar यांनी केली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी श्री. पवार साताऱ्यात आले होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे उपस्थित होते.

राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी किती दिवस राहिल माहित नाही. भाजपसोबत त्यांची बोलणी सुरु आहेत, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादी ही भाजपची ब टीम असल्याचेही त्यांनी वक्तव्य केले होते.

Prithviraj Chavan, Sharad Pawar
Ajit Pawar यांचा शिंदे-फडणवीसांना टोला |Eknath Shinde|Devendra Fadnavis|NCP|BJP|Sarkarnama

याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना साताऱ्यात विचारले. त्यावर ते म्हणाले, त्यांच्या पक्षात त्यांचे काय स्थान आहे. ए, बी, सी की डी आहे ते एकदा तपासावे. त्यांच्या पक्षातील एका सहकार्याला विचारले यांची कॅटॅगरी कोणती आहे, ते तुम्हाला समजेल. पण ते खासगीत सांगतील. जाहीर करणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com