पावसातील सभेने भाजपची सत्ता उलथवली याचा राज ठाकरेंना विसर : शशीकांत शिंदे

भाजपची BJP सत्ता गेली. त्यामुळेच ते पवार साहेब Sharad Pawar व पावसावर राग काढतात.
Raj Thackeray, Sharad Pawar, Shashikant Shinde
Raj Thackeray, Sharad Pawar, Shashikant Shindesarkarnama

सातारा : साताऱ्यातील त्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार बोलण्यास उभे राहिले अन्‌ पाऊस सुरू झाला. त्यांचे भाषण संपल्यानंतर पाऊस कमी झाला. हे निसर्गाचे संकेत होते. हे राज ठाकरेंना माहित नसेल. पण, पवारसाहेबांनी पावसात भिजत दिलेल्या संकेतातूनच भाजपची सत्ता जनतेने उलथवून टाकली. हा निसर्गाने दिलेला कौल होता, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे यांनी केली आहे.

साताऱ्यातील पावसातील सभेवर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला आमदार शशीकांत शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. शशीकांत शिंदे म्हणाले, राज ठाकरेंनी साताऱ्यातील पावसातील सभेवरून पवार साहेब यांच्यावर टीका केली आहे. ही टीका पूर्णपणे चुकीची व हस्यास्पद आहे. पवार साहेब हे जाणीवपूर्वक सभेत भिजलेले नव्हते. तीस हजारांवर जनसमुदास सभेस उपस्थित होता. सभेपूर्वी पाऊस नव्हता पण पवार साहेब सभेत बोलण्यास उभे राहिले अन्‌ पाऊस सुरू झाला.

Raj Thackeray, Sharad Pawar, Shashikant Shinde
'अजिंक्यताऱ्या'च्या विकासासाठी सातारा पालिकेची झाली किल्ल्यावर सभा

त्यांनी पावसाला सांगितले नव्हते की, मी आलो की पाऊस सुरू करा. ते नैसर्गिक वातावरण होते. पवार साहेबांचे भाषण संपल्यानंतर पाऊस कमी झाला. हे निसर्गाचे संकेत होते. हे राज ठाकरेंना माहित नसेल. अनेक लोक या पावसाच्या सभेवर जाणीव पूर्वक भिजल्याची टीका करतात. मुळात या सभेतूनच भाजपला बाजूला काढण्यासाठी संकेत पवार साहेबांनी दिले होते. या सभेला मीही उपस्थित होतो. पाऊस मोठ्याप्रमाणात होता. लोक भिजत सभा ऐकत होते.

Raj Thackeray, Sharad Pawar, Shashikant Shinde
फडणविसांच्या खुर्चीला दणका देणाऱ्या पावसातील त्या ऐतिहासिक सभेची वर्षपूर्ती

त्यामुळे हे सर्व ठरवून झालेले नव्हते नैसर्गिक होते. यातूनच काहीजण पवार साहेब व पावसांवर राग काढत असले तरी त्यांचे दू:ख आम्हाला माहिती आहे. ती नैसर्गिक परिस्थिती होती. काही लोक ठरवून सांगतात, ते धादांत खोटे आहे. साहेबांनी उत्स्फुर्तपणे भाषण केले त्यातूनच पावसाने दिलेल्या संकेतातूनच भाजपची सत्ता जनतेने उलथवून टाकली. हा निसर्गाने दिलेला कौल होतो. त्यातून भाजपची सत्ता गेली. त्यामुळेच ते पवार साहेब व पावसावर राग काढत टीका करतात याचीच खंत वाटते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com