
Kolhapur News : लोकांच्या इच्छेचा सन्मान करण्याची (लोकसभा निवडणूक लढविण्याची) भूमिका शाहू महाराज छत्रपती यांनी घेतली तर आम्हाला आनंदच होईल. पण, त्यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, असं त्यांनी माझ्या कानावर घातलं आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहू महाराजांच्या लोकसभा उमेदवारीवर भाष्य केले. (Sharad Pawar's big comment about Kolhapur Lok Sabha candidature)
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शुक्रवारी (ता. २५ ऑगस्ट) कोल्हापुरात जाहीर सभा झाली. त्यानंतर आज (ता. २६ ऑगस्ट) त्यांची पत्रकार परिषद झाली. शाहू महाराज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले होते. सभेपूर्वी शाहू महाराज हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार असतील, अशी चर्चा रंगली होती. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला पवार यांनी उत्तर दिले.
कोल्हापुरात प्रवेश करताना कालच्या एवढी गर्दी मी कधी पाहिली नाही. तसेच माण, खटाव, नाशिक आणि बीडमध्येही असेच चित्र होते. याचा अर्थ आम्ही लोकांची जी भूमिका मांडतोय, त्याचे समर्थन करणारी असावी, असा निष्कर्ष आज आम्ही काढू शकतो. आगामी निवडणुकीत नव्या लोकांना संधी देण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांच्या मनात आहे. त्या रस्त्याने आम्ही जाऊ, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले की, शाहू महाराज छत्रपती यांनी सभेचे अध्यक्षपद स्वीकारले, हे फार मोठी गोष्टी आहे, त्याचा आम्हाला आनंद झाला. जयंत पाटील आणि शाहू महाराज यांच्यात काय बोलणं झालं, हे मला माहिती नाही. कारण त्यांच्यातील बोलणं झाल्यानंतर ते बोलायला उभे राहिले. मला वाटतं होतं की ते एक दोन शब्द बोलतील. पण ते सविस्तरपणाने बोलले. त्यांनी सध्याच्या परिस्थितीचं विश्लेषण केले.
पक्षांतर करणारी जी प्रवृत्ती आहे, त्यासंदर्भात त्यांनी आपले परखड मत त्यांनी मांडले. जवळपास सर्व विरोधकांना त्यांनी एक दिशा दाखवली आहे. त्यामुळे आम्ही शाहू महाराजांचे आभारी आहोत. कारण ते आले, त्याचा आम्हाला आनंद झाला. ते बोलल्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी सविस्तर अशी भूमिका मांडल्यामुळे आम्हाला अधिकचा आनंद झाला. कोल्हापूरच्या सार्वजनिक प्रश्नावर शाहू महाराज भूमिका मांडतात. पण राजकीय भूमिका त्यांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतली. पण, शाहू महाराजांनी विरोधकांचे बळ वाढवलं, त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत, असे पवार यांनी नमूद केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.