Pawar Will Contest in Madha? : माढ्यातून लोकसभेसाठी शरद पवारांच्या नावाचा आग्रह; सुप्रिया सुळे म्हणतात...

Loksabha Election : राष्ट्रवादी काँग्रेसने माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे.
Sharad Pawar-Supriya Sule
Sharad Pawar-Supriya SuleSarkarnama

Pandharpur News : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत. या वेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली‌ जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. (Sharad Pawar will not contest Lok Sabha elections from Madha: Supriya Sule)

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज (ता. ८ ऑक्टोबर) माळशिरस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी माढ्यातून लोकसभेसाठी शरद पवारांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती.

Sharad Pawar-Supriya Sule
Pandharpur-Mangalveda Politics : पंढरपूर-मंगळवेढ्यात भालकेंच्या माध्यमातून बीआरएसचा करिश्मा चालणार का?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी माढ्यातून शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत, असे स्पष्ट केले. तसेच माढ्यात आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल. सर्वांनी एकत्रित बसून लवकर उमेदवार ठरवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर दिली आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माढ्यात दौरा सुरू केला आहे. मागील १५ दिवसांत त्यांचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. या निमित्ताने त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Sharad Pawar-Supriya Sule
Cabinet Expansion : राष्ट्रवादीच्या आणखी तिघांना मिळणार मंत्रिपद; घटस्थापनेचा मुहूर्त, ‘ही’ तीन नावे चर्चेत

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे या माळशिरसचा दौरा करून सोलापूर शहरात येणार आहेत. महेश कोठे यांच्यासाठी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या मेळाव्याला खासदार सुळे या उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर मोहोळ आणि कुर्डूवाडी येथे मेळावा घेणार आहेत.

Sharad Pawar-Supriya Sule
Solapur NCP News : भविष्यात दाऊदला भाजपत घेतलं तरी फडणवीस त्याचं स्वागत करतील : महेश कोठेंची टीका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com