शशिकांत शिंदेंचा पराभव पवारसाहेबांच्या जिवाला लागला : श्रीनिवास पाटील

मेहनत घेतली, तर आगामी निवडणुकीत कोरेगावमध्ये विजयी गुलाल आपणच उधळू
jayant patil
jayant patilSarkarnama

कोरेगाव (जि. सातारा) : ‘‘मागील निवडणुकीत शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना विधानसभेत पाठविण्यात आपण कमी पडलो. ही कमी आपल्याला आगामी २०२४ च्या निवडणुकीत भरून काढायची आहे. शशिकांत शिंदे यांचा पराभव शरद पवारसाहेबांच्या (sharad Pawar) जिवाला प्रचंड लागला. त्यामुळे बूथवर कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करा. आपण मेहनत घेतली, तर आगामी निवडणुकीत विजयी गुलाल आपणच उधळू,’’ असा विश्वास साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) यांनी व्यक्त केला. (Sharad Pawar was saddened by the defeat of Shashikant Shinde : Srinivas Patil)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रा सातारा जिल्ह्यात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली. त्यात श्रीनिवास पाटील यांनी वरील खंत बोलून दाखवली. कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदे यांचा पराभव कसा झाला आणि पुढच्या वेळी जागा निवडून कशी येईल, यावर झाली.

jayant patil
जयंतरावांचा शंभूराज देसाईंना सूचक इशारा : आम्ही ताकदीने लढलो; तर टिकाव लागणार नाही!

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, कोरेगावची जागा गेली, त्याचे शल्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात आहे. आता अडीच वर्षांचा काळ लोटला आहे. बूथवर जर काम केले तर आपण विजयाची पहिली पायरी चढू. पवारसाहेबांनी शशिकांत शिंदे यांना पराभव झाल्यानंतर लगेच विधान परिषदेवर पाठवले आणि त्यांचा सन्मान कायम ठेवला. पक्षाचा शशिकांत शिंदे यांना संपूर्ण पाठिंबा आहे.

jayant patil
राज ठाकरेंनी आता कोणाची सुपारी घेतली, हे फडणवीसच सांगतील : पटोलेंचा टोला

‘‘आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांवर आपण मात करू. मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधा, एक तास राष्ट्रवादीसाठी, पुरोगामी विचारांसाठी हा कार्यक्रम आपण सुरू केला आहे. प्रत्येक महिन्याला ही बैठक घ्या. लोकांमध्ये चर्चा निर्माण होईल, लोक आपले प्रश्न घेऊन येतील आणि आपोआप ते लोक आपल्याशी जोडले जातील. कोणत्याही परिस्थितीत कोरेगाव मतदारसंघात आपल्याला विजय मिळवायचा आहे,’’ असा निर्धारही पाटील यांनी बोलून दाखवला.

jayant patil
तोळामासाची काँग्रेस सत्यजित देशमुखांना कोणत्या पदाचा शब्द देणार?

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला सातारा आहे. दोन महिन्यांत आपण पूर्ण संघटना बांधू. लोकांचे प्रश्न सोडवू. आपण पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत, मरगळ झटकून त्यांच्याप्रमाणेच जिद्दीने लढू.

jayant patil
शिवसेनेत वाद पेटला : महिला शिवसैनिकांकडून शहरप्रमुखाला शाखेतच मारहाण

या आढावा बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, आयटी सेल राज्यप्रमुख सारंग पाटील, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवती अध्यक्ष सक्षणा सलगर, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, युवती जिल्हाध्यक्ष पूजा काळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com