शरद पवार म्हणाले; देश व राज्य एकसंघ ठेवण्याचे आव्हान

Sharad Pawar| Kolhapur| political news| केंद्रसरकार ईडी, सीबीआयचा वापर करुन काम बंद करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते मुर्खाच्या नंदनवनात राहत आहेत.
Sharad Pawar|
Sharad Pawar|

कोल्हापूर : आज आपण संघर्षाचा काळातून जातोय त्यामुळे देश व राज्य एकसंघ ठेवण्याचे आव्हान आहे. २०१४ मध्ये परिस्थिती वेगळी होती. मनमोहन सिंग ( Manmohan Singh) यांच्या नेतृत्वाखाली विकासाची खबरदारी घेतली गेली होती. मात्र २०१९ मध्ये भाजपची (BJP) सत्ता आली. जनतेचा कौल होता. परंतु सत्तेचा उपयोग कसा सुरु आहे हे आपण बघत आहोत. समाजातील सर्व घटक एकत्र राहतील ही नेतृत्वाची जबाबदारी असते परंतु आज दिल्लीत हल्ले, जाळपोळ झाली. केजरीवाल यांच्या हातात सत्ता असली करी गृहखातं अमित शहा यांच्याकडे आहे. देशाची राजधानी एकत्र राहण्याची खबरदारी घेतली नाही. दिल्लीत काही घडले की त्याचा संदेश जगात जातो, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे.

कोल्हापूर येथील जाहीर संकल्प सभेत ते बोलत होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूरमध्ये जबरदस्त शक्तीप्रदर्शन केले. या संकल्प सभेत शरद पवार यांनी केंद्रसरकारवर जोरदार निशाणा साधला. मागच्या आठवड्यात कर्नाटकात होतो. तिथेही जातीय दंगली झाल्या. ज्याठिकाणी भाजपची सत्ता आहे त्याठिकाणी असे प्रकार घडत आहेत, अशी नाराजीही शरद पवार यांनी व्यक्त केली. केंद्रसरकार ईडी, सीबीआयचा वापर करुन काम बंद करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते मुर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. राष्ट्रवादी याचा समाचार घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

Sharad Pawar|
राणा दाम्पत्याला दणका; जामीनावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार

गेले दोन वर्षे अनेक संकटे असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जयंत पाटील व त्यांचे सहकारी यांनी दौरे करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी उमेदवार दिला त्याला विजयी केल्याबद्दल आणि आघाडी धर्म पाळल्याबद्दल उत्तम काम केल्याबद्दल शरद पवारांनी कोल्हापूरकरांचे अभिनंदन केले. निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार आहे, परंतु विध्वंस वाढेल असा प्रकार झाल्याने शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. काश्मीरी पंडितांवर सिनेमात त्यांच्यावरील अत्याचार दाखवला, जातीय संघर्ष दाखवला गेला आहे आणि त्यातून मताचा जोगवा मागण्याचा प्रयत्न केला गेला. माणसां-माणसामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही शरद पवारांनी यावेळी केला.

चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. पराभव झाला की कुठेतरी जाईन बोलले होते. त्यावेळी सभेतून हिमालयात असे शब्द येता शरद पवार यांना हसू आवरले नाही. त्यांचा बंदोबस्त केलात त्याबद्दल कोल्हापूरकर हुशार आहात, अशा शब्दांत शरद पवारांनी कोल्हापूरकरांना शाबासकी दिली. चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात घोषणा जाण्याची घोषणा केली पण हिमालयात जातात की नाही यामुळे माझी काळजी वाढली, असे शरद पवारांनी सांगितले. त्यातच आमचे जयंत पाटील त्यांना सोडायला जाणार होते, असेही शरद पवार यांनी सांगितले.

सत्तेचा गैरवापर होतोय. ईडी सीबीआय इन्कमटॅक्स यांना पाठवून भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांवर दबाव आणला जातो. राष्ट्रवादीच्या दोन सहकार्‍यांना जेलमध्ये टाकले गेले. एखादा अधिकारी चुकीचा वागत असेल तर त्याच्यावर कारवाई होत नाही. आमचे नवाब मलिकांवर मात्र नाहक कारवाई झाली. वस्तूस्थिती एक आणि सांगायचं दुसरं... माझ्यावर टिका केली प्रसिद्ध मिळते. काही लोकांना मी शाहूंचेच नाव का घेतो असे बोलतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाही. महाराज तुमच्या - माझ्या हदयात आहेत. राजे अनेक होऊन गेले परंतु ३०० - ४०० वर्षानंतरही ज्या राजाची आठवण राहते तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची असेही शरद पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com