शरद पवार म्हणाले, रोहित पवार यांची विकासकामे अहिल्यादेवी होळकरांच्या विचारानुसारच...

ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी सांगितले की, आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांचे मतदार संघातील विकासकार्य अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारानुसार सुरू आहे.
NCP Chief Sharad Pawar News, Rohit Pawar News
NCP Chief Sharad Pawar News, Rohit Pawar NewsSarkarnama

अहमदनगर - चौंडी ( ता. जामखेड ) येथे अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव आज सुरू आहे. या उत्सव प्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांचे कर्जत-जामखेड मतदार संघातील विकासकार्य हे अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारानुसार सुरू असल्याचे सांगितले. ( Sharad Pawar said, Rohit Pawar's development works are according to the thoughts of Ahilya Devi Holkar ... )

या उत्सव कार्यक्रमाला अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, दत्तात्रेय भरणे, आमदार रोहित पवार, नीलेश लंके, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, होळकरांचे वंशज भुषणसिंहराजे होळकर, बाळासाहेब आजबे, रामहरी रुपनर, अनिल गोटे, अक्षय शिंदे, सक्षण सलगर, विश्वास देवकाते आदी उपस्थित होते.

NCP Chief Sharad Pawar News, Rohit Pawar News
राम शिंदेंची कडी : अहिल्यादेवींना पहाटेच केले अभिवादन

शरद पवार म्हणाले, या ऐतिहासिक जयंती सोहळ्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे कर्तृत्त्व पोहोचविण्याचे काम होत आहे. देशात तीन कर्तृत्त्वान महिलांचे नाव घेतले जाते. यात राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा यात समावेश आहे. सत्ता हातात आल्यावर त्याचा वापर कसा करावा. चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन व समाजातील चुकीच्या गोष्टींना कसे थांबवावे हे अहिल्यादेवी होळकरांकडून शिकण्यासारखे आहे.

NCP Chief Sharad Pawar News, Rohit Pawar News
अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी तुफान राडा; पडळकर-खोत यांना पोलिसांनी चौंडीजवळ रोखलं

ते पुढे म्हणाले की, कर्जत-जामखेड व परिसर हा दुष्काळी भाग आहे. मागील अडीच वर्षांत रोहित पवार यांनी चांगली विकासकामे केली आहेत. त्यांच्या कामांच्या मागे अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आहेत. अहिल्यादेवी होळकर यांनी सर्वांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले तसे रोहित पवार यांनी मतदार संघातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. अहिल्यादेवींनी प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल असे प्रयत्न केले. त्या प्रमाणे रोहित पवारांनी मतदार संघात एमआयडीसी आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बैठक करून लवकरच एमआयडीसी आणणार आहे. त्यातून प्रत्येकाला काम मिळेल. दोन राष्ट्रीय महामार्गांची कामे होत आहेत. त्यातून दळणवळण सुधारून परिसरात विकासाची गंगा येईल. यासाठी तुमची सर्वांची साथ मिळावी, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com