राष्ट्रवादी भवनावरील दगडफेक दुर्दैवी : शरद पवार

सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदेंचा पराभव झाला.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama

महाबळेश्वर (सातारा) : जिल्हा बॅंक निवडणुकीच्या (Satar District Bank Election) पार्श्वभूमीवर काल साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनावर दगडफेक झाली. ही घटना खूपच दुर्दैवी आहे. काही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे कृत्य केले. परंतु, ज्यांच्यासाठी हे कृत्य केले, त्यांनी स्वतः या प्रकारासाठी दिलगिरी व्यक्त केली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केले. ते आज महाबळेश्वरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

Sharad Pawar
पवार म्हणाले, शशिकांत शिंदेंनी निवडणूक गांभीर्यांने घ्यायला हवी होती...

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या वक्तव्याला उत्तर देताना पवार म्हणाले, जिल्हा बॅंकेची निवडणूक कोणतेही पॅनल किंवा महाआघाडीमार्फत लढण्याचे ठरले नव्हते, त्यामुळे अपयश आलेल मोठ्या मनाने मान्य केले पाहिजे. तसेच सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदेंचा पराभव झाला. मात्र, मी अद्याप त्यांच्या पराभवाचे कारण काय असू शकेल, याच्या खोलात गेलेलो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यात मोठी राडेबाजी पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या 1 मतानं पराभव झाला. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते ज्ञानदेव रांजणे यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली. ज्ञानदेव रांजणे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक केली, या घटनेनंतर शरद पवार यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

Sharad Pawar
शशीकांत शिंदेच्या पराभवाने शरद पवारही नाराज : जिल्ह्यातील नेत्यांची झाडाझडती

शंभूराज देसाई यांनी काय म्हंटले होते?

जिल्हा बॅंकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांकडून मला आपण एकत्रित निवडणूक लढवायची आहे, असे निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाही राज्यस्तरीय नेत्याचा, जिल्ह्यातील नेत्यांचा कोणाचाच संपर्क झाला नाही. शिवसेनेला एकाकी पाडायचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत असेल, तर आम्ही पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना सांगून लोकशाही मार्गाने शिवसेनेच्या वतीने आम्ही यापुढे स्वतंत्र निवडणुका लढवू, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com