Sharad Pawar Resigned : पठ्ठ्याने स्वत:च्या रक्ताने लिहले पवारांना पत्र; "साहेब.. शेतकऱ्यांच्या मुलांना तुमची गरज.."

Sharad Pawar resigned : अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी मी त्यांना माझ्या रक्ताने पत्र लिहिले आहे."
Sharad Pawar resigned
Sharad Pawar resignedSarkarnama

Sharad Pawar Resigned : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राज्यप्रमाणेच सांगोला तालुक्यातील खिलारवाडी सारख्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी स्वत:च्या रक्ताने पत्रच लिहिले. भूषण चंद्रकांत बागल असं या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असलेल्या तरुणाने रक्ताने लिहलेले पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

Sharad Pawar resigned
Sharad Pawar Resigns As NCP Chief : सुप्रिया सुळेंच्या भविष्यवाणीतला पहिला भूकंप आज झाला, दुसरा कधी होणार?

मुंबई येथे एका कार्यक्रमाच्या पुस्तक उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी आपण अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. अचानकपणे हा निर्णय जाहीर करण्यामुळे राज्यातील राष्ट्रवादी पक्षातील सर्व कार्यकर्ते भावनिक झालेले दिसून आले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी त्यांना भावनिक सादही घातली. एकीकडे त्यांच्यासमोर नेतेमंडळी, कार्यकर्ते त्यांना साद घालत असतानाच सांगोला तालुक्यातील खिलारवाडी सारख्या ग्रामीण भागातील भूषण चंद्रकांत बागल या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहिले आहे.

Sharad Pawar resigned
Beed APMC News : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गड राखले ; भाजपमध्ये केवळ धस, आडसकरांनाच जमले..

शरद पवार यांना आपली भावना समजावी म्हणून भूषण बागल याने चक्क स्वतःच्या रक्ताने "साहेब आपणास पत्र लिहिण्यामागचा हेतू की, मी एका शेतकऱ्याचा मुलगा व राष्ट्रवादीचा कट्टर कार्यकर्ता आहे. साहेब मी आपणास देव मानतो. परंतु साहेब आपण पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय माघारी घ्यावा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपली नितांत गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून आपण आपला राजीनामा देण्याचा निर्णय मागे घ्या." अशी भावनिक साद या पत्रातून भूषण बागल यांनी घातली आहे.

Sharad Pawar resigned
Sharad Pawar : मुंबई केंद्रशासित होण्याचा चर्चेला आता पूर्णविराम द्यायला हवा; शरद पवारांनी पुस्तकात मांडली भूमिका

दरम्यान, भूषण बागल याने सरकारनामाशी बोलताना म्हंटले की, "पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याची महाराष्ट्रासह देशालाच आज नेतृत्वाची गरज आहे. अचानकपणे पक्षाचा अध्यक्ष पदाचा राजीनामा देणे हे योग्य नाही. त्यांनी दिलेल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी मी त्यांना माझ्या रक्ताने पत्र लिहिले आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com