सीमा प्रश्नावरील समितीत पवार, चव्हाण, राणे, फडणवीसांसह दानवेंचा समावेश

Maharashtra-Karnataka News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी विचार विनिमय होणार...
Devendra Fadnavis and Sharad Pawar
Devendra Fadnavis and Sharad Pawar Sarkarnama

Maharashtra-Karnataka News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची पुर्नरचना करण्यात आलीय. या समितीमध्ये महाराष्ट्रातील तब्बल १४ मोठ्या नेत्यांचा करण्यात आला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka) सीमाप्रश्न सोडविण्यासाठीच्या समितीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे अध्यक्ष असतील. तर या समितीमध्ये राज्यातील वेगवेगळ्या पक्षांचे तब्बल १४ सदस्य आहेत. या उच्चस्तरीय समितीमध्ये राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटलेला नाही.

Devendra Fadnavis and Sharad Pawar
ठाकरेंची एक शाखा ताब्यात तर दुसरी जमीनदोस्त; राजकारण तापले

या प्रश्नावरच सर्वोच्च न्यायालयात चाललेल्या विवादामध्ये राज्याची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी या समितीकडून मार्गदर्शन अपेक्षित असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या समितीची पहिली बैठक येत्या सोमवारी (दि.२१ नोव्हेंबर २०२२) रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी राज्याची बाजू सक्षमपणे सर्वोच्च न्यायालयात कशी मांडता येईल, याबाबत विचार विनिमय होणार आहे.

Devendra Fadnavis and Sharad Pawar
Aurangabad : निवेदन देण्यास परवानगी नाकारल्याने जाधव भडकले, म्हणाले मी पापी आहे का ?

या समितीत कोणाचा समावेश आहे? :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री शंभूराज देसाई, सुरेश खाडे, तानाजी सावंत, यांची यामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com