शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी

सांगलीतील २८ दलित संघटनांनीही आम्हाला पाठिंबा दर्शवून विश्‍वास व्यक्त केला होता.
Sharad Pawar, Prakash Ambedkar
Sharad Pawar, Prakash Ambedkar Sarkarnama

सांगली : कोरेगाव-भीमा (Koregaon Bhima) येथील दंगल प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे (Sambhaji Bhide) यांच्या विरोधात पोलिस तपासात कोणताही पुरावा नाही. यामुळे त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले नसल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी त्यांचा यात सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar)वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आबंडेकर (Prakash Ambedkar) यांनी अकारण हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप केले. जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, दंगलीतील सूत्रधारांच्या अटकेसाठी राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Sharad Pawar, Prakash Ambedkar
सोमय्या यांनी भेट घेताच राणा दांपत्याच्या डोळ्यात अश्रू.....

चौगुले म्हणाले, कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांचा कोणताही संबंध नव्हता. तरीही आधारविना प्रकाश आंबेडकर व शरद पवार यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या सहभागाचा आरोप केला. मानवी आयोगासमोर ज्यावेळी लेखी म्हणणे मांडण्याची वेळ आली, त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी या संदर्भात काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांची ही दुटप्पी भूमिका समोर आली आहे. राज्यातील दलित समाजांत यामुळे गैरसमज निर्माण करण्यात आला. राज्यभर दंगली घडविण्याचे कारस्थान यामागे होते. त्यांनी जनतेची माफी मागावी. दंग्यामागे राज्यातील काही संघटनांचा समावेश आहे. शासनाने व पोलिसांनी आता या प्रकरणातील खऱ्या सूत्रधारांना शोधावे. जोपर्यंत त्यांना अटक होऊन कारवाई होत नाही, तोपर्यंत लढत राहणार. सुरुवातीला निवेदने देण्यात येतील. त्यानंतर वेळप्रसंगी मोर्चेही काढण्याचा इशारा चौगुलेंनी दिला.

Sharad Pawar, Prakash Ambedkar
एसटीचे वातावरण खराब करणाऱ्यांना सोडणार नाही; अनिल परबांचा इशारा

ते म्हणाले, तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा व अन्य अधिकाऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटना तसेच दलित संघटनांची एकत्रित बैठक घेतल्यामुळे सांगलीत शांतता प्रस्थापित झाली. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांनाही शांततेचे श्रेय जाते. घटनेनंतर लगेचच उदयनराजे यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. सांगलीतील २८ दलित संघटनांनीही आम्हाला पाठिंबा दर्शवून विश्‍वास व्यक्त केला होता. पुणे पोलिसांनी प्रामाणिकपणे व निपक्षपातीपणाने तपास केल्याने सत्य बाहेर आले. त्यामुळे पुणे पोलिसांचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी आता सूत्रधाराचा शोध घेऊन कारवाई करावी, ही अपेक्षा आहे, असे मत मांडले.

Sharad Pawar, Prakash Ambedkar
'भाजपने राज ठाकरेंचा टप्प्यात कार्यक्रम केला!'

दरम्यान, भोंग्याबाबात प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत मांडलेले मत योग्य आहे. आम्ही त्याचे समर्थन करतो, पण दुसरीकडे मशिदींनी स्वतःहून पुढाकार घेत भोंगे बंद केले आहेत. त्यामुळे राज्यातही असा प्रतिसाद मिळेल, असे चौगुले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com