शरद पवारांनी केले युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक...

युवक काँग्रेसच्या Youth Congress पदाधिकाऱ्यांना शरद पवार Sharad Pawar यांनी अर्धा तासच वेळ देऊन सुद्धा युवक काँग्रेसच्या आठवणीत श्री. पवार रमले.
Sharad Pawar with Youth congress Incumbent
Sharad Pawar with Youth congress Incumbentkarad Reporter

कऱ्हाड : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचाही भेट घेतली. दिल्ली येथील सहा जनपथ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी श्री. पवार यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना मार्गदर्शन केले. (Sharad Pawar with Youth congress News)

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना शरद पवार यांनी अर्धा तासच वेळ देऊन सुद्धा युवक काँग्रेसच्या अनुभवात पवार रमले. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी जवळपास अडीच तास चर्चा कशी रंगली याचे भानच कुणाला राहिले नाही. निवडून आलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यासोबत श्री. पवार यांनी संवाद साधला. यावेळी शिवराज मोरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

Sharad Pawar with Youth congress Incumbent
कराडचे शिवराज मोरेंची युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

युवक काँग्रेसच्या निवडणुक प्रक्रीयेची माहिती घेतली. श्री. मोरे यांनीही राजकीय कारकीर्द, विद्यार्थी काँग्रेसमधील क्षण, आंदोलनासहीत उपाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास सांगितला. यावेळी श्री. पवार यांनी त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, उत्तम संघटन कौशल्य आहे. अशीच कारकीर्द सुरू ठेवल्यास उद्याचे भविष्य समृद्ध असेल असे म्हणत त्यांनी मोरे यांच्या संघटन कौशल्याचेही विशेष कौतुक केले. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना श्री. पवार यांनी राजकारणाची सुरुवात युवक काँग्रेस मधून झाली. त्यात पुणे युवक काँग्रेसचा अध्यक्ष असल्यापासून ते राज्याचा सरचिटणीस पदापर्यंतची त्यावेळची निवडणूक प्रक्रिया त्यांनी समजून सांगितली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com