शाब्बास अभिजित...! : सांगोला कारखाना सुरू करणाऱ्या पंढरपूरच्या पाटलांचे शरद पवारांकडून कौतुक

बारा वर्षांपासून बंद असलेला सांगोला कारखाना अभिजित पाटील यांनी दोन महिन्यांत सुरू केला.
Sharad Pawar_Abhijeet Patil
Sharad Pawar_Abhijeet PatilSarkarnama

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांना घरघर लागलेली असतानाच गेल्या 12 वर्षापासून बंद असलेला सांगोला शेतकरी साखर कारखाना सुरु केल्याबद्दल डीव्हीपी उद्योग समुहाचे प्रमुख व धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी विशेष कौतुक करुन त्यांच्यावर कौतुकाची थापही मारली. (Sharad Pawar praised Abhijeet Patil of Pandharpur)

दुष्काळी सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या 12 वर्षापासून बंद होता. या बंद साखर कारखान्यावर राज्य सहकारी बॅंकेचे मोठे कर्ज आहे. बॅंकेने हा कारखाना पंढरपूरचे अभिजीत पाटील यांच्या धाराशिव साखर कारखान्याला 25 वर्षांच्या भाडेपट्टा कराराने चालवण्यास दिला आहे. धाराशिव साखर कारखान्याने बंद असलेला हा कारखाना अवघ्या दोन महिन्यांत सुरु केला आहे. विजयादशमीच्या दिवशी प्रत्यक्ष मोळी टाकून कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरुदेखील केला आहे. कारखान्याचे ऊस गाळप व्यवस्थीत सुरु झाले आहे. त्यानंतर अभिजीत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी बारामती येथे शरद पवार यांची भेट घेवून त्यांना कारखान्यात तयार झालेली पहिली साखर भेट दिली.

Sharad Pawar_Abhijeet Patil
नगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करणार : अजित पवार

या वेळी ‘शब्बास अभिजीत’ अशी कौतुकाची थाप टाकून अभिजीत पाटील यांचे शरद पवार यांनी विशेष कौतुकही केले. या वेळी पवार यांनी पाटील यांच्या साखर उद्योगातील यशस्वी वाटचाली विषयीही माहितीही जाणून घेतली. अभिजीत पाटील यांनी सांगोला साखर कारखाना ताब्यात घेतल्यापासून प्रत्यक्ष गाळप हंगाम सुरु करण्यापर्यंतची सर्वती माहिती पवार यांना दिली.

Sharad Pawar_Abhijeet Patil
नगरमधील आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना तातडीची पाच लाखांची मदत जाहीर

या वेळी शरद पवार यांनी साखर उद्योगातील विविध अडचणी आणि समस्यांविषयीही चर्चा केली. मला वाटत नव्हते, हा साखर कारखाना सुरु होईल; परंतु अभिजीतने तो घेऊन सुरु केला. याचा मला आनंद आहे, असे कौतुक करत कारखान्याला सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासनही पवार यांनी या वेळी दिले. सोलापूर जिल्ह्यातील बंद असलेल्या इतर साखर कारखान्यांबाबतही विचारपूस करत त्यांनी माहिती जाणून घेतली.

या वेळी संचालक संतोष कांबळे, रणजीत भोसले, सुरेश सावंत, संदीप खारे, आबासाहेब खारे, संजय खरात, सुहास शिंदे, सुशील जगताप, हणमंत पाटील आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in