Sharad Pawar News : कांद्याची निर्यात सुरू करून, शेतकऱ्यांना मदत करा : शरद पवारांनी सरकारला सुनावले !

Onion Farmers : "कांद्याला प्रतिक्विंटल किमान बाराशे रूपयांचा भाव मिळायला पाहिजे.."
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama : Sharad Pawar

Sharad Pawar News : महाराष्ट्रात सद्या कांदा हा प्रश्न पेटलेला आहे. कांद्या हा प्रश्न शेतकऱ्यांच्या बांधावरून ते बाजारपेठ अन् राज्याच्या विधिमंडळापर्यंत पेटलेला दिसून येतो. कांद्याला योग्य भाव मिळत नाही. कांदा खरेदी वेळवर होत नाही, म्हणून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. कांद्याचा हा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित झाला. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar
Jalgaon Politics: निष्ठावान नेत्याकडून ठाकरेंच्या गडाला सुरुंग; शेकडो पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

शरद पवार म्हणाले, नाफेडची खरेदी होत नाही, असा अनुभव आहे. कांदा निर्यात सुरू करावी. कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला कमीत कमी १२०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळावा. मध्य प्रदेश, गुजराच आणि राजस्थान सरकारमध्ये काही ना काही मदत झालेली आहे. मात्र महाराष्ट्रात नुसती चर्चाच चालू आहे. अजूनही त्यांच्याकडून काही मदत झालेली नाही. किमान कांद्याची निर्यात तरी सुरू करा. जिरायती शेतकऱ्यांना अधिक संरक्षण देण्याची गरज आहे."

पवार पुढे म्हणाले, "कांदा हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. अवकाळी पाऊसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी. अवकाळी पावसामुळे आंब्यांचा मोहोराचं नुकसान झालं आहे, द्राक्ष शेतीचं नुकसान झालं आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी. "

Sharad Pawar
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद का गेलं? मनसे नेत्यानं सांगितली 'ही' चार कारणं

रासायनिक खते खरेदी करताना ई-पॉस मशिनमध्ये नोंदणी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जात आहे. सांगलीतून हे प्रकरण समोर आले होते. यावरही पवार यांनी भाष्य केले. "टीव्हीवर मी यासंबंधी बातमी पाहिली. खरंतर शेतकऱ्यांना जात विचारणे चुकीचं आहे, असे पवार म्हणाले. तसेच नागालँड संबंधि पवारांनी यावेळी पुनरुच्चार केला. पवार म्हणाले, "नागालँडच्या मुख्यंमंत्र्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे, भाजपला नाही. भाजपशी आम्ही सहकार्य केलेले नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com