दोन हजार कोटीची एसटी बँक गिळंकृत करण्याचा डाव ; पडळकरांचा गंभीर आरोप

दोन हजार कोटीची एसटीची बँक व मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे.
दोन हजार कोटीची एसटी बँक गिळंकृत करण्याचा डाव ; पडळकरांचा गंभीर आरोप
gopichand padalkarsarkarnama

सांगली : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)यांच्यावर एसटी आंदोलनानंतर बँक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे.गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओतून पडळकरांनी पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.

"मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. पण आता काहींनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे," असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

gopichand padalkar
फेसबूक पोस्ट शेअर करुन भाजप नेत्यानं संपवलं आयुष्य..

पडळकर म्हणाले, "बँकेची निवडणूक घोषीत केली आणि जे सदस्य थकबाकीदार आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही, असा फतवा काढला आहे. साहाजिकच जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही,''

gopichand padalkar
कोरेगाव-भीमा प्रकरण : शरद पवारांची ५ मे रोजी होणार साक्ष

"१९९५ ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यताप्राप्त करून दिली,'' असा आरोप पडळकरांनी केला आहे. “शरद पवारांच्या घरावर जो हल्ला झाला, त्याचं आम्ही समर्थन करत नाही. त्या गोष्टीचं कुणीच समर्थन केलं नाही. परंतु पवारांची भूमिका दुटप्पी आहे," असा आरोप काही दिवसापूर्वी पडळकरांनी पवारांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.