Satara : भाजपमध्ये अनेक प्रवेश होणार आहेत; जयकुमार गोरेंचा विश्वास

येत्या काळात भाजपची विचारधारा BJP ideology स्वीकारून या भागाच्या विकासप्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.
Jayakumar Gore Latest Marathi News,
Jayakumar Gore Latest Marathi News,Sarkarnama

खटाव : कऱ्हाड उत्तरचे गेली अनेक वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी पालकमंत्र्यांनी इथल्या हणबरवाडी धनगरवाडी पाणीयोजनेसह अनेक विकासकामे केली नाहीत. त्यांना शेतकऱ्यांच्या यातना माहित नाहीत. अशी टीका भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी यांनी केली.

करवडी येथे आयोजित भाजपच्या संवाद यात्रेतील मेळाव्यात आमदार गोरे बोलत होते. गेल्या दोन दिवसांतील संवाद यात्रेदरम्यान गावोगावच्या लोकांनी झालेल्या अपमानाचा पाढा वाचला. अनेकांचा स्वाभिमान दुखावला आहे.

Jayakumar Gore Latest Marathi News,
PFI : पाच वर्षांच्या बंदीनंतर पीएफआयला NIAचा आणखी मोठा दणका

अन्याय झालेले अनेकजण बदला घेण्याच्या तयारीत आहेत. येत्या काळात भाजपची विचारधारा स्वीकारून या भागाच्या विकासप्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. लवकरच त्या सर्वांना भाजपमध्ये सामावून घेतले जाईल, असेही आमदार गोरेंनी सांगितले.

Jayakumar Gore Latest Marathi News,
Satara : मोदींच्या अजेंड्यावरुनच गोरेंकडून टीका : रामराजे

यावेळी कऱ्हाड उत्तरचे नेते धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, श्रीनिवास जाधव, सागर शिवदास, भीमरावकाका पाटील, सुरेश पाटील, महेश जाधव, महेंद्र डुबल, दीपाली खोत, सुजाता जाधव, चंद्रकांत मदने, प्रमोद गायकवाड, सरपंच पिसाळ तसेच मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in