‘अजितदादांच्या मनात काय, हे साहेबांनासुद्धा कळंलं नाही, त्यामुळे ते कधी झटका देतील सांगता येत नाही!’

आता येथून पुढं अजितदादांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच भाषणं ऐकावीत. ओशोच्या कॅसेट आणाव्यात, तसेच इंदुरीकर महाराजांची कीर्तनंही ऐकावीत.
Ajit Pawar-Shahaji Patil
Ajit Pawar-Shahaji PatilSarkarnama

पंढरपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde)-भारतीय जनता पक्षाच्या (BJP) गळाला लागतील का नाही? हा माझ्यासारख्या छोट्या माणसाचा मुद्दा नाही. माझं आणि अजितदादांचं नातं हे वेगळं आहे, आमच्या नात्यात जिव्हाळा आहे. पण, अजितदादांच्या मनात काय आहे, कुणाला कळत नाही. जिथं शरद पवारसाहेबांनासुद्धा (Sharad Pawar) कळंलं नाही, तिथं मला कळंल? त्यामुळे अजितदादा कधी झटका देतील, हे सांगता येत नाही, असे शिवसेनेचे सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी म्हटले आहे. (Sharad Pawar does not know what is in Ajit Pawar's mind : Shahaji Patil)

आमदार शहाजी पाटील हे पंढरपूर येथे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना अजित पवार हे एकनाथ शिंदे-भाजपच्या गळाला लागतील का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पाटील यांनी खास माणदेशी शैलीत उत्तर दिले.

Ajit Pawar-Shahaji Patil
ZP Presidents Reservation : राज्यातील ३० ZP अध्यक्षांचे आरक्षण जाहीर; सोलापूर ओबीसी, तर पुणे खुले

आमदार पाटील म्हणाले की, आता येथून पुढं अजितदादांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच भाषणं ऐकावीत. ओशोच्या कॅसेट आणाव्यात, तसेच इंदुरीकर महाराजांची कीर्तनंही ऐकावीत. भाषणं ऐकण्याशिवाय आमच्या दादांना आता काय काम राहिले आहे. अजित पवार विरोधी पक्षनेते झाले आहेत. मात्र, त्या पदावर काम कसं करावं, हे त्यांना अजून कळणं झालं आहे. कारण, अजित पवार हे कायम सत्तेवर राहिले आहेत. दादाला सत्तेचं गणित जुळलं आहे. पण, विरोधी पक्षात राहायचं गणित त्यांना अजून जुळंना झालं आहे.

Ajit Pawar-Shahaji Patil
आमदारांना माहित नसलेला पंढरीचा विकास आराखडा कुणी तयार केला : भालकेंचा हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. त्यावरून घराणेशाहीचा आरोप शिंदे गटावर होत आहे. त्याबाबत आमदार शहाजी पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे गटाच्या प्रत्येक घटनांमागे नाराजी आहे, असे चित्र शिल्लक शिवसेनेकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक उभा केले जात आहे. आम्ही सर्व ४० आमदारांनी निस्वार्थीपणाने हा निर्णय स्वीकारला आहे. मुळात आमच्यात पदासाठी कोणताही वाद नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com