जिल्हा बॅंकेच्या निकाला दिवशी शरद पवार, अजित पवार साताऱ्यात!

त्याच दिवशी सातारा जिल्हा बँकेच्या Satara dcc election Result निवडणुकीचा निकाल असून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb patil, आमदार शशीकांत शिंदे Shashikant shine, माणचे मनोज पोळ Manoj pol, खटावचे नंदकुमार मोरे Nandkumar More, कोरेगावचे शिवाजीराव महाडिक Shivajirao Mahadik, पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर Satyajit Patankar यांचे जिल्हा बँकेतील भवितव्य समजणार आहे.
जिल्हा बॅंकेच्या निकाला दिवशी शरद पवार, अजित पवार साताऱ्यात!

सातारा : यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार उद्या (मंगळवारी) कराडला मुक्कामी येत आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही महाबळेश्वरात येत आहेत. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकालाही त्याच दिवशी असून महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळाव्यास श्री. पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकालादिवशीच उद्या (मंगळवारी) रात्री साडे आठ वाजता खासदार शरद पवार कराडात मुक्कामी येणार आहेत. दुसऱ्या दिवशी २४ नोव्हेंबरला सकाळी साडे आठ वाजता यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन करून ते वेणुताई चव्हाण ट्रस्टच्या बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी दहा वाजता ते भिलार येथे जाऊन कै. बाळासाहेब भिलारे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. तेथून ते दुपारी साडे बारा वाजता महाबळेश्वरला जाणार असून दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत राखीव असेल. तीन वाजता ते राष्ट्रवादी युवकच्या राज्यस्तरीय मेळाव्यास उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते पुण्याकडे रवाना होतील.

जिल्हा बॅंकेच्या निकाला दिवशी शरद पवार, अजित पवार साताऱ्यात!
कोणी कितीही गर्जना करू देत; जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार...

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या (मंगळवारी) सकाळी दहा वाजता हेलिकॉप्टरने महाबळेश्वरला येणार आहेत. त्यानंतर त्यांचे मोटारीने हॉटेल ड्रिमलॅण्ड येथे आगमन होईल. तेथे ते राष्ट्रवादी युवकच्या राज्यस्तरीय मेळाव्यास मार्गदर्शन करून हेलिकॉप्टरने दिवेआगार रायगडकडे रवाना होतील. त्याच दिवशी सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल असून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशीकांत शिंदे, माणचे मनोज पोळ, खटावचे नंदकुमार मोरे, कोरेगावचे शिवाजीराव महाडिक, पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर यांचे जिल्हा बँकेतील भवितव्य समजणार आहे. त्यामुळे या निकालाची माहितीही ते घेणार आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निकालादिवशीच खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता लागली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in