'शरद पवार, अजितदादा अन्न चोरणाऱ्या कार्यकर्त्यांना थारा देणार नाहीत'

अकोले तालुक्यात आज मध्यरात्री दोन वाजता भारतीय जनता युवा मोर्चाच्या ( Bhartiya Janata Yuva Morcha ) कार्यकर्त्यांनी स्वस्तधान्य वितरण करणारा ट्रक पकडला. हा ट्रक राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) पदाधिकाऱ्याचा असल्याचा त्यांचा आरोप आहे.
'शरद पवार, अजितदादा अन्न चोरणाऱ्या कार्यकर्त्यांना थारा देणार नाहीत'
vaibhav pichadSarkarnama

अकोले ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच अकोले तालुक्यातील नवलेवाडी फाटा येथे आज मध्यरात्री दोन वाजता भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी स्वस्तधान्य वितरण करणारा ट्रक पकडला. हा ट्रक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याचा असून या ट्रकमधून धान्याचा काळा बाजार होत असल्याचा भाजप युवा मोर्चाचा आरोप आहे. या संदर्भात भाजपचे नेते माजी आमदार वैभव पिचड यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. या प्रसंगी त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संबंधित कार्यकर्त्यावर कारवाईची मागणी केली. 'Sharad Pawar, Ajit Dada will not give shelter to activists who steal food'

या ट्रकमध्ये गहू, तांदूळ, डाळ असे 200 पिशव्या होत्या. हे धान्य पुन्हा सरकारी गोदामात पाठविण्यात आले. तहसीलदार सुरेश थेठे, पोलिस अधिकारी मिथुन घुगे, मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन ट्रक व त्यातील धान्याचा पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला. माजी आमदार वैभव पिचड यांनी या धान्याची कसून चौकशी करून कारवाई करावी अन्यथा तहसीलदार कचेरीसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदार कचेरीत जाऊन माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

vaibhav pichad
ज्यांना मोठे केले, तेच सोडून गेले ! माजी आमदार वैभव पिचड यांचा टोला 

वैभव पिचड म्हणाले, ही एकाच वर्षातील तिसरी घटना असून प्रशासनाने याबाबत अधिक माहिती घेऊन या रॅकेट मध्ये कुणाचे हितसंबंध अडकले आहे त्याची पोलखोल करावी. दिवाळीमध्ये गोरगरीब जनतेचे धान्य काळा बाजारात जात असेल तर लोकप्रतिनिधी करतात काय? असा सवाल उपस्थित करून तहसीलदार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोन दिवसांत संबंधितांना अटक करून चालेलला गैरप्रकार थांबवा अन्यथा तहसीलदार कचेरीसामोर धरणे आंदोलन करणार, असा इशारा माजी आमदार वैभव पिचड यांनी दिला.

पिचड पुढे म्हणाले, गरिबांचे अन्न चोरायचे आणि वर धमक्या द्यायच्या हे चालणार नाही. प्रशासनाने अमक्याचा फोन तमक्याचा फोन म्हणून सोडून देऊ नये. गरिबांचे अन्न चोरतो त्याला फक्त जेल झाली पाहिजे. गरिबांचे अन्न चोरू नका आणि चोरणाऱ्यांना थारा देऊ नका. गरीब व्यक्ती सणासुदीला अन्न येईल. गोडधोड खाऊ या आशेवर बसले आहेत. अकोले तालुक्यात अन्नधान्य पुरवठा करणारे अधिकारी बदलतात पण ठेकेदार बदलले गेले नाहीत.

vaibhav pichad
मला या वयात रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका - मधुकरराव पिचड

या पूर्वी तालुक्यात अन्न धान्य चोरी करणारा ट्रक पकडला. त्यावर आमदारांचे पोस्टर होते. आज पुन्हा दुसऱ्याचा अन्न धान्य चोरणारा ट्रक पकडला त्यावरही आमदारांचे पोस्टर आहेत. ठेकेदार एका पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याला धान्यवितरणाचे अधिकार दिले आहे. वेळ आल्यावर त्याच्या बाबत आणखी उघड करून सांगेल, असेही पिचडांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, तो ठेकेदार एका पक्षाचा म्हणून मिरवतो. तो गरिबांचे अन्न चोरायची भुमिका घेत आहे. त्या जुन्या पक्षात मीही काम केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार अशा कार्यकर्त्याला थारा देणार नाहीत. त्यांच्याकडे तक्रार केली तर तेही कारवाई करतील. गरिबाचे हक्काचे अन्न त्यांच्या घरापर्यंत गेले पाहिजे. गरिबांचे अन्न चोरून माणसे मोठी होत आहेत. मोठ मोठे पोस्टर लावताना दिसत आहेत. कष्टकरी माणूस अऩ्नधान्याची वाट पाहत आहे. अऩ्नधान्याचा काळाबाजार चालला आहे. सत्ता असो अथवा नसो मी गरिबांचे अऩ्न चोरणाऱ्यांना धडा शिकविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही वैभव पिचड यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी राज गवादे, राहुल देशमुख, शंभू नेहे यांनी केलेल्या कामगिरीबद्दल कार्यकर्त्यांनी सत्कार केला.

vaibhav pichad
स्नेहलता कोल्हे यांनी पिचड कुटुंबीयांना भेटून दिली श्रद्धा व सबुरीची शाल

रात्रीच्या वेळी आयशर गाडीत चालविलेले धान्य ताब्यात घेतले असून योग्य पद्धतीने चौकशी करून संबंधितावर कारवाई करू.

- तहसीलदार सतीश थेटे, अकोले तालुका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.