
Nagar : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने नगर जिल्हा केंद्रस्थानी ठेवला आहे. लोकसभेला शिर्डी आणि नगर दक्षिणेतून उमेदवार उतरवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांच्यानंतर नगर दक्षिणेतून जिल्ह्यात तगडे राजकीय वर्चस्व असलेले गडाख परिवारातील शंकरराव गडाख यांची उमेदवारीची तयारी केली आहे. यासाठी आघाडीतील वरिष्ठ नेत्यांसोबत गडाखांच्या उमेदवारीची चर्चा झाली आहे. यशवंतराव गडाख यांच्या सोबत अंतिम चर्चा होऊन पुढील रणनीती तयार करण्याचे ठरले आहे. (Latest Marathi News)
1991 मध्ये न्यायालयीन लढाईमुळे दिवंगत बाळासाहेब विखे विरुद्ध यशवंतराव गडाख ही लढत देशात गाजली. यात शरद पवारांनाही ओढले गेल्याने पवार-विखे राजकीय वैर तयार झाले ते अद्यापही कायम आहे. त्यामुळेच बद्दलत्या राजकीय घडामोडीत शंकरराव गडाखांच्या उमेदवारीला ते सकारात्मक असतील, जोडीला सोयरे-धायरे राजकारण आणि विखेंना राजकीय परंपरागत विरोध या त्रिवेणी योगातून बाळासाहेब थोरात हे गडाखांसाठी अनुकूल असतील. शंकरराव गडाखांच्या नावावर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात चर्चा झाली आहे. यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांची मोठी भूमिका असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार निलेश लंके यांना 2024 साठी अनुकूलता होती. त्यांनी खासदार सुजय विखे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केल्याचे चित्र असतानाच राष्ट्रवादी मधील फुटीत लंके अजित पवार यांच्या सोबत आहेत. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांचे नाव पुढे येत आहेत. पण खुद्द थोरात याबद्दल बोलत नसल्याने त्यांची उमेदवारी अनिश्चित अशीच आहे. या परिस्थितीत खासदार विखेंना तोडीसतोड आव्हान गडाख कुटुंबाकडून दिले जाऊ शकते आणि त्याला शरद पवार-बाळासाहेब थोरात यांची सहमती असेल असे बोलले जाते.
आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षाच्या उद्धव ठाकरेंच्या कारकीर्दीनंतर दोन राजकीय भुंकप झाले. त्याचे पडसाद आता 2024 च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत निश्चित दिसणार आहे. असाच धक्का आता नगर दक्षिण लोकसभेला मतदारांसमोर येत असून सुजय विखे यांच्या विरोधात ठाकरे शंकरराव गडाख यांना उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.