शंकरराव गडाखांनी दिली जनतेला हाक : म्हणाले, मला आपल्याशी बोलायचंय..!

माजी मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांनी सोमवारी (ता. 11) रोजी बैठकीचे आयोजन केले आहे.
Shankarrao Gadakh News Updates, Ahmednagar News in Marathi
Shankarrao Gadakh News Updates, Ahmednagar News in MarathiSarkarnama

सोनई ( जि. अहमदनगर) - मागील काही दिवसांपासुन घडलेल्या घटना, त्यातून झालेले आरोप-प्रत्यारोप, सध्या निर्माण झालेल्या राजकीय घडामोंडीवर मला आपणा सर्वांशी संवाद साधायचा आहे, अशी हाक सोशल मीडियावर टाकून माजी मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांनी सोमवारी (ता. 11) रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. Shankarrao Gadakh News Update

सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत माजी मंत्री गडाख काय निर्णय घेणार याविषयी चर्चेला उधाण आले आहे.माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ राहणार, मुख्यमंत्री शिंदे गटात सामील होणार की भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार या विषयी चर्चेचा फड रंगू लागला आहे. मुळा पब्लिक स्कुल परिसरात होत असलेल्या मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व संस्थेचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच व कार्यकर्त्यांना निरोप देण्यात आला आहे.

Shankarrao Gadakh News Updates, Ahmednagar News in Marathi
Video: शंकरराव गडाख मतदान केंद्रातून थेट रुग्णालयात

शिवसेनेतील चाळीस आमदार व दहा अपक्ष आमदार बंडाच्या वाटेने गेले असताना माजी मंत्री गडाख शेवटपर्यंत माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ होते. यापूर्वी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व माजी मंत्री गडाख यांनी घेतलेले सर्व राजकीय निर्णय कार्यकर्त्यांना विचारात घेवूनच घेतलेले आहे.काँग्रेस पक्षात राहणे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणे, किंवा तीन साडेतीन वर्षापूर्वी राष्ट्रवादी सोडून क्रांतीकारी शेतकरी पक्षाची स्थापना करणे हे सर्व निर्णय त्यांनी कार्यकर्त्यांना विचारुनच घेतले आहे.सध्याच्या राजकीय उलथापालथ नंतर जिल्हा परिषद,पंचायत समिती व नेवासे नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर गडाख काय भुमिका घेणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. एवढे मात्र खरे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in