कैसे छोड दू अकेला उनको, जिसे हराने सारी दुनिया एक हो चूकी है..!

माजी मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.
Shankarrao Gadakh & Uddhav Thackeray
Shankarrao Gadakh & Uddhav ThackeraySarkarnama

सोनई ( जि. अहमदनगर ) - दोन दिवसापूर्वी सोशलमीडियावर गडाख यांनी 'मला आपणा सर्वांशी बोलायचे आहे' अशी हाक दिल्यानंतर राज्यात व जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. शिंदे गट, भाजप की राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा करणार याविषयी तालुक्यात अंदाजाच्या फैरी सुरु झाल्या होत्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर अजून वेगळ्या अफवा होवू नये याकरीता आज तातडीने मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमास पंधरा हजाराहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. ( Shankarrao Gadakh decided to stay with Uddhav Thackeray )

पत्रकारांशी बोलताना शंकरराव गडाख म्हणाले, कैसे छोड दू अकेला उनको, जिसे हराने सारी दुनिया एक हो चूकी है..! असा शेर ऐकव माजी मंत्री गडाख यांनी ठाकरे यांच्याच पाठीशी भक्कम राहणार असल्याचे सांगितले. न्यायालयीन निर्णयानंतर राज्य व जिल्ह्याचे चित्र स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले

Shankarrao Gadakh & Uddhav Thackeray
Video: शंकरराव गडाख मतदान केंद्रातून थेट रुग्णालयात

मेळाव्यात ते म्हणाले, सुरत आणि गुवाहाटीचं निमंत्रण धडकावून माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची साथ सोडली नव्हती. सत्तांतर झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा होवू लागल्याने आज सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना सांगतो सत्ता असो अथवा नसो मी ठाकरेंच्या हाताला दिलेला हात सोडणार नाही, अशी जाहीर भुमिका शंकरराव गडाख यांनी मांडली.

प्रास्तविक भाषणात अॅड काकासाहेब गायके यांनी मंत्रीपदाच्या माध्यमातून गडाखांनी तालुक्यात आणलेल्या निधीबद्दल कौतुक केले.माजी मंत्री गडाख यांनी तालुक्यात केलेली विकास कामे सर्वासमोर आहे असे सांगून खुर्चीसाठी राजकीय उलथापालथ होत असताना काय निर्णय घ्यावा याबाबत मनात घालमेल होती, असे सांगितले.

Shankarrao Gadakh & Uddhav Thackeray
शंकरराव गडाख म्हणाले, हा हल्ला म्हणजे मला राजकारणातून संपविण्याचा कट

मी राजकारणात संघर्ष करत जय- पराजय पाहिलेला आहे. गुवाहाटीवरुन माझ्या आमदार मित्रांनी संपर्कही केला मात्र त्या अमिषाला न भुलता ठाकरे यांच्याबरोबरच राहायचे ठरविले.आज त्याच निर्णयावर मी ठाम असल्याचे सांगितले. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. विरोधक खालच्या पातळीचे राजकारण करत असताना मी संयम ठेवून आहे. माझ्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशाराही त्यांनी भाषणात दिला.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले, "मतदार यादीतील नाव कमी करुन माझ्यावरही कोर्ट, कचेऱ्या झाल्या मात्र मी डगमगलो नाही. आम्हालाही 'इडी'चा धाक दाखविला जात आहे." क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या बॅट चिन्हाने विधानसभा निवडणुकीत 30 हजाराचे लीड दिले आता 50 हजाराच्या लीड करीता कामाला लागा असे सांगून त्यांनी आज दिसत असलेली आपली ताकद जिल्हा परिषदेच्या सर्व जागा जिंकून देईल, असे सांगितले.

मेळाव्यात सुहास गोंटे, जानकीराम डौले, प्रकाश शेटे, मछिंद्र मस्के,संजय सुखदान, अजित मुरकुटे यांचे भाषण झाले. रेवनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब मोटे यांनी आभार मानले .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in