गोव्याच्या CM सावंतांना शनिदेव पावला : उपमुख्यमंत्री आजगावकरांच्या मागे साडेसाती

गोवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज हाती आले.
Manohar Ajagavkar while taking darshan of Saturn God
Manohar Ajagavkar while taking darshan of Saturn GodVinayak Darandale

अहमदनगर - गोवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज हाती आले. या निवडणूक मतदान प्रक्रिया सुरू असताना गोव्यातील भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर शनिशिंगणापूरमध्ये ( जि. अहमदनगर ) येऊन गेले. त्यांनी शनीला अभिषेक करत प्रार्थना केली होती. यातील मुख्यमंत्री सावंत यांना शनिदेव पावला आहे. तर उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ( Shanidev steps on CM Sawant of Goa: Deputy Chief Minister Azgaonkar )

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत 26 फेब्रुवारीला शनिशिंगणापूरला येऊन गेले. त्यांच्या पाठोपाठ 4 मार्चला गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर हे सुद्धा शनी दर्शनाला येऊन गेले. त्यामुळे भाजपचे गोव्यातील शिर्ष नेते शनीचे दर्शन का घेत आहेत यावर उलटसुलट चर्चा रंगली होती. या शनी दर्शनातून गोव्यातील भाजपला विजय मिळाला तरी राजकीय धक्का बसू शकतो असे कयास लावले जात होते.

Manohar Ajagavkar while taking darshan of Saturn God
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्रीही शनी दर्शनाला

मनोहर आजगावकर यांनी मडगाव मतदार संघातून निवडणूक लढविली होती. आजगावकरांना काँग्रेसच्या दिगंबर कामत यांच्याकडून 7 हजार 794 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साखळी मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यांचा अवघ्या 500 मतांनी विजय झाला. काँग्रेसच्या धर्मेश सगलानी यांचा त्यांनी पराभव केला. या निसटत्या विजयासह प्रमोद सावंत यांनी त्यांच्या मतदार संघात विजयी होण्याची हॅट्ट्रिक केली. त्यामुळे सावंतांना शनिदेव पावले आहेत.

Manohar Ajagavkar while taking darshan of Saturn God
साडेसाती फेडण्यासाठी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा शनी दर्शनाला

मुख्यमंत्री सावंत व उपमुख्यमंत्री आजगावकर यांना आपले प्रतिस्पर्धे जड ठरू शकतात याचा अंदाज आला होता. त्यामुळे त्यांनी शनिशिंगणापूरला शनी दर्शन व शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला होता. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना दोघांनीही भाजपच्या विजयावर विश्वास व्यक्त केला असला तरी स्वतःच्या विजया बाबत देवाकडे प्रार्थना केली होती.

गोव्यात भाजपला 20, काँग्रेसला 12, मगोपला 2, आपला 2 व इतर पक्षांना 4 जागा मिळाल्या. गोव्यात मुख्यमंत्री पदाचा शपथविधी 14 मार्चला होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com