Satara News : दहा वेळा शड्डू ठोकायची माझी तयारी आहे : शंभूराज देसाईंचे अजितदादांना प्रतिउत्तर

Shambhuraj Desai मंत्री देसाईंवर बाेलताना अजित पवार यांनी देसाईंच्या शड्डू ठाेकण्याच्या स्टाईलवर टीका केली. त्याला श्री. देसाई यांनी प्रतिउत्तर दिले.
Ajit Pawar, Shambhuraj Desai
Ajit Pawar, Shambhuraj Desaisarkarnama

Shambhuraj Desai News : दादा माझी तब्येत कशीही असली तरी एकदा शड्डू ठोकून थांबणारा शंभूराज देसाई नाही. यानंतर सुद्धा दहा वेळा शड्डू ठोकायची माझी तयारी आहे. पण, मी स्वत:हून माझ्यावर बंधन घातली आहेत. हे जर असेच चालू राहिले तर मलासुद्धा मर्यादा झुगारुन बालावे लागेल, असे प्रतिउत्‍त्तर साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांना दिले.

काेयनानगर येथे विराेधी पक्ष नेते अजित पवार Ajit Pawar यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde आणि साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली हाेती. यावेळी मंत्री देसाईंवर बाेलताना अजित पवार यांनी देसाईंच्या शड्डू ठाेकण्याच्या स्टाईलवर टीका केली. त्याला श्री. देसाई यांनी प्रतिउत्तर दिले.

मंत्री देसाई म्हणाले, अजित पवारांनी अत्यंत नैराश्येतून भाषण केलं. अजित पवारांचे थंड झालेलं स्वागत आणि सभागृहात 2 हजारांपेक्षा जास्त माणसे नसावित. अजितदादांनी नैराश्येतून माझ्यावर टीका केली. एक बोट आपण दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा चार बोटं आपल्याकडे असतात हे त्यांनी विसरु नये.

Ajit Pawar, Shambhuraj Desai
Satara News : ही तर सत्तेच्या भांगेची नशा.. सदाभाऊ, शंभूराज देसाई भिडले....

दादा तब्येत माझी कशी ही असली तरी एकदा शड्डू ठोकून थांबणारा शंभूराज देसाई नाही. यानंतर सुद्धा दहा वेळा शडू ठोकायची माझी तयारी आहे, असेही देसाईंनी नमूद केले. अजित दादा आणि माझी जुनी मैत्री आहे म्हणून अजून सुद्धा मी शांत आहे, असेही देसाईंनी स्पष्ट केले.

Ajit Pawar, Shambhuraj Desai
Pune News : मोठी कारवाई! पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्याला अटक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी जमालगोटा शब्दाचा वापर हा असंसदीय असल्याची टीका विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी केल्यानंतर त्याला मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे. नवीन लोकसभेचा इमारतीचे उद्घाटन होते आहे त्यावर काही विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला गेला.

Ajit Pawar, Shambhuraj Desai
Sambhajiraje Chhatrapati यांनी सांगितला Swarajya पक्षाचा प्लॅन | MVA | BJP | Shivsena | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम बघून पोटशूळ उठला आहे तो शमविण्यासाठी मुखमंत्री ग्रामीण भागातील असल्याने त्यांनी ग्रामीण प्रचलित शब्द जमालगोटा हा शब्द वापरला आहे. त्यामुळे अजित पवारांनी याचे भांडवल करणे योग्य नाही. यापूर्वी अजितदादांकडून अनेक वेळा वेगवेगळे शब्द प्रयोग झाले होते याचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देसाईंनी दिला.

Ajit Pawar, Shambhuraj Desai
LIVE: PM Narendra Modi यांचे देशाला संबोधन | New Parliament Building Inauguration | Sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in