Shambhuraj Desai : शिंदेंना बंडासाठी उद्युक्त केल्याने लाल दिवा फिक्स...

एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी बंड केल्यानंतर After the rebellion त्यांच्यासोबत पहिल्यांदा जाण्याचा निर्णय पाटणचे Patan आमदार MLA व माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी घेतला.
Shambhuraj Desai, Eknath shinde
Shambhuraj Desai, Eknath shindesarkarnama

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या पाच मंत्र्यांच्या यादीत सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांच्या नावाचा समावेश झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत पहिल्यांदा जाण्याचा निर्णय पाटणचे आमदार व माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. यावरून श्री. देसाई यांच्यावर टीकाही झाली. पण त्यांनी शिंदे यांची साथ सोडली नाही. आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे.

Shambhuraj Desai, Eknath shinde
video : एकनाथ शिंदेंच्या मदतीला जयंत पाटील धावले

त्यासाठी शिंदे गटाच्या पहिल्या पाच मंत्र्यांच्या यादीत शंभूराज देसाई यांचा समावेश आहे. त्यामुळे ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री मंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शंभूराज देसाईंना गृहराज्यमंत्रीपद दिले होते. तसेच त्यांच्या वित्त, नियोजन आदी विविध पदांचा ही पदभार होता.

Shambhuraj Desai, Eknath shinde
सातारचा पालकमंत्री कोण : शिवेंद्रसिंहराजे की शंभूराज देसाई

आता एकनाथ शिंदेंच्या मंत्रीमंडळात पहिल्या पाच मंत्र्यांच्या यादीत शंभूराज देसाईंचे नाव आल्याने जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. कॅबिनेट मंत्री पदासह त्यांना पालकमंत्री पद हवे आहे. त्यामुळे भाजप साताऱ्याचे पालकमंत्रीपद स्वतः कडे ठेवणार की शिवसेनेला देणार त्यावर सर्व काही अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com