
-हेमंत पवार
Karad News : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी ७० हजार कोटी रुपये खर्च करुनही एक टक्का ही सिंचन झालेले नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना केले होते. घाईगडबडीत फाईल क्लिअर केल्या की तसे होते. जनतेचे हीत, राज्याच्या तिजोरीचा पैसा योग्य प्रकारे खर्च झाला पाहिजे, याचा विचार करुन आम्ही फाईलवर सह्या करतो, निर्णय घेतो. मुख्यमंत्री शिंदे यांनी गावी सुट्टीवर आल्यावरही ६५ फाईल प्रलंबित न ठेवता त्या क्लिअर केल्या, असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit Pawar यांना लगावला.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन सरकारने शासकीय योजनांची जत्रा सुरु केली आहे. त्याचा राज्याचा प्रारंभ दौलतनगर (ता. पाटण) येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १३) होत आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री देसाई म्हणाले, शासकीय योजनांत पात्र असणारा एकही लाभार्थी या योजनेपासुन वंचित राहु नये यासाठी ही मोहिम हाती घेतली आहे. त्यामध्ये शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ तब्बल २० ते २५ हजार लाभार्थ्यांना लाभ एकाच दिवशी देण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी ७० हजार कोटी रुपये खर्च करुनही एक टक्का ही सिंचन झालेले नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना केले होते. तसे होवु नये म्हणुन आम्ही जनतेचे हीत, राज्याच्या तिजोरीचा पैसा योग्य प्रकारे खर्च झाला पाहिजे, याचा विचार करुन आम्ही फाईलवर सह्या करतो, निर्णय घेतो. याची कल्पना कदाचित अजित पवार यांना नसावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.