Patan : शिवजयंतीदिनी शंभूराज देसाई देणार युवकांना नोकरीची संधी; पाटणला महामेळावा

Shambhuraj Desai पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याकरीता हा उपक्रम राबवला जात आहे.
Minister Shambhuraj Desai
Minister Shambhuraj Desaisarkarnama

Shambhuraj Desai News : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या जयंती सोहळा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवक व युवतींना नोकरीची संधी उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी रविवार (ता. 19) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत दौलतनगर (मरळी, ता.पाटण) येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे शिव दौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी दिली आहे.

यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकांत म्हटले की, पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याकरीता हा उपक्रम राबवला जात आहे. या नोकरी महामेळाव्यात पुणे, सातारा व कोल्हापूर येथील विविध नामवंत कंपन्यांचा सहभागी होणार आहेत.

या नोकरी महामेळाव्यात इयत्ता पाचवी ते पदवीधर उत्तीर्ण असलेल्या युवक युवतींना नोकरी मिळण्याच्यादृष्टीने मोफत सहकार्य करण्यात येणार आहे. दरम्यान या नोकरी महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक युवक व युवतींनी दौलत नोकरी महामेळाव्याचे वेबाईवरील फॉर्म आवश्यक त्या माहितीसह भरुन ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच रविवार (ता. 19) महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे उपस्थित राहिलेल्या युवक युवतींच्या दोन सत्रामध्ये मुलाखती घेण्यात येणार आहेत.

Minister Shambhuraj Desai
Patan : ठाकरे सेनेच्या महाप्रबोधन यात्रेचा मायनस शून्य टक्के परिणाम होईल : देसाई

मुलाखत व निवड झालेल्या युवक युवतींचे निवड पत्रांचे वाटपही यावेळी करण्यात येणार आहे. या नोकरी महामेळाव्यात मॅन्यूफॅक्चरिंग टेलिकॉम,बँकींग फायनान्स,बीपीओ/केपीओ रिटेल,ट्रेनिंग हॉटेल्स व सिक्यूरिटी हॉस्पीटॅलिटी या सेक्टरच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या रोजगार महामेळाव्यामध्ये पाटण विधासभा मतदारसंघातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी सहभागी व्हावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.

Minister Shambhuraj Desai
Satara : नवीन उद्योगांसह रोजगार निर्मिती होणार; शिवेंद्रसिंहराजेंची उद्योग मंत्र्यांशी चर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com