Shambhuraj Desai : 'शहाजीबापूंचं घर त्यांच्या डोळ्यात खुपतंय, अंधारेंना कावीळ झालाय!'

Shambhuraj Desai : स्वकष्टातून घर बांधले आहे
Sushma Andhare | Shanbhuraj Desai | Shahajibapu Patil
Sushma Andhare | Shanbhuraj Desai | Shahajibapu Patil Sarkarnama

Shambhuraj Desai : शिवसेनेत नव्यानेच दाखल झालेल्या सुषमा अंधारे यांनी कसलेही पुरावे नसताना हवेत आमच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. शहाजाबापू हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत. स्वत:च्या कष्टातून जमिन, स्वकष्टातून घर बांधले आहे, हे सुषमा अंधारेंच्या डोळ्यात खुपत आहे. अंधारेंना कावीळ झालेला असावा; अशी टीका शिंदे गटाचे नेते व राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांनी केली.

सुषमा अंधारे शिवसेनेत येण्यापूर्वी शिवसेना (Shiv Sena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काय बोलल्या, याची आठवण करून द्यायला हवे. विधिमंडळात (Nagpur) नागपूर येथे एनआयटीच्या उच्च न्यायालयाचा आलेला निकाल राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात केला आहे. अंधारे या आता सभागृहात नाहीत, त्यांना कधी सभागृहात येण्याची संधीच मिळणार नाही, असाही खोचक टोलाही देसाई यांनी लगावला.

Sushma Andhare | Shanbhuraj Desai | Shahajibapu Patil
Rupali Patil Thombare on Sushma Andhare : 'वारकरी नव्हे, भाजपचे भामटे अंधारेंबद्दल बोलतायत'

आपण किती कडक शब्दात बोलतो, हे त्यांच्या वरच्या नेत्यांना दाखवण्यासाठी, अंधारे बोलत असतात, अशी टिका ही शंभूराजे देसाई यांनी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण होऊन, अंधारेंना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला गेला आहे. यापूर्वी सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काय बोलेले ते त्यांना चालतं का ? असा ही प्रश्न त्यांनी विचारला.

Sushma Andhare | Shanbhuraj Desai | Shahajibapu Patil
Narendra Modi : 'वन रँक वन पेन्शन' वरून काँग्रेस भाजपमध्ये जोरदार जुंपली!

राऊतांनी उगाच हवेत तीर मारू नये :

सुरज परमार या प्रकरणी संजय राऊत यांनी उगाच हवेत तीर मारू नये. संजय राऊत यांच्याकडे आम्ही गांभीर्याने पाहत नाही. पत्राचाळ प्रकरणात ते फक्त जामिनावर सुटलेत. अनेक नव्या बाबी या प्रकरणी समोर येत आहेत, असे ही देसाई म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com