शंभूराज देसाई म्हणतात, आगामी निवडणुकीतच विरोधकांना 'ट्रेलर' दाखवतो...

लोकनेते बाळासाहेब देसाई Balasaheb Desai यांची शिकवण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांचे मार्गदर्शन यामुळेच पाटण Patan विधानसभा मतदारसंघात आपल्याला भरीव विकास काम उभे करता आले.
Shambhuraj Desai, Satyajit Patankar
Shambhuraj Desai, Satyajit Patankarsarkarnama

ढेबेवाडी : ''जिल्हा बँकेच्या १०२ मतांवरून तालुक्यातील तीन लाख मतांचा अंदाज बांधणे हस्यास्पद असून दूर कशाला आगामी जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकीतच विरोधकांना ट्रेलर दाखवू,'' असा टोला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला आहे.

पाच कोटीच्या निसरे-मारुलहवेली-गुढे-काळगाव रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन मंत्री देसाई यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी कुठरे ता. पाटण) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. जे.आर पाटील यांच्या हस्ते मंत्री देसाई यांचा सत्कार करण्यात आला.

Shambhuraj Desai, Satyajit Patankar
पाटणकर ठरले 'जायंट किलर'; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

मंत्री देसाई म्हणाले,''आमचे खाते आणि मंत्रिपद काहींच्या डोळ्यात खुपत आहे. मात्र, खुशाल खुपूद्यात, सर्वसामान्यांच्या विकासाशी असलेली माझी बांधिलकी आणि जोडलेली नाळ मी कधीही तुटून देणार नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई यांची शिकवण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन यामुळेच पाटण विधानसभा मतदारसंघात आपल्याला भरीव विकास काम उभे करता आले. मध्यतरी कोव्हिडच्या काळात शासनापुढे अडचणी होत्या. परंतु उर्वरित काळात दुप्पट वेगाने कार्यरत राहणार आहोत.''

Shambhuraj Desai, Satyajit Patankar
मला मुख्यमंत्र्यांनी गृहखाते का दिले, शंभूराज देसाई यांनी दिले उत्तर..

''पाटण तालुका आपणास पश्चिम महाराष्ट्रातील विकासाचे रोल मॉडेल बनवायचे आहे. पाटण तालुक्यातील अनेक रस्त्यांनी कधी डांबर पाहिलेले नव्हते. तेही रस्ते चकचकीत केलेले असून एकाच टप्प्यात एक्कावन नळ योजना मंजूर करून आणल्या आहेत. विकासकाम देताना मी मताच राजकारण कधी केलं नाही आणि करणारही नाही. विकासाच्या पाठीशीच सामान्य माणूस उभा राहतो. यावर माझा ठाम विश्वास आहे. मी संयमी माणूस आहे. विजयाने कधी हुरळलो नाही आणि पराभवाने कधी खचलोही नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com