शंभुराज देसाईंनी सांगितले शिंदे सरकारचे वास्तव; राज्याच्या तिजोरीत पैसेच नाहीत

केंद्र सरकार राज्याला तातडीने निधी देणार असल्याचेही देसाई (Shambhuraj Desai) यांनी सांगितले.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisarkarnama

कऱ्हाड : राज्याच्या तिजोरीत पैसेच नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ज्या गोष्टीवर प्राधान्याने खर्च करायचा आहे त्यासाठीच आमचे प्राधान्य आहे.अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

निती आयोगाची बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भेटुन १९ हजार कोटी रुपयांचे विशेष प्रस्ताव राज्य सरकारतर्फे दिले आहे. त्यासाठी तातडीने निधी देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे, असे देसाई म्हणाले.

Shambhuraj Desai
'मविआ' सरकारमध्ये मंत्री असुनही मला निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता...

अधिवेशनानंतर मंत्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी देसाई म्हणाले, मी राज्याचा अर्थराज्य मंत्री होतो. त्यावेळी निर्णय घेण्याचा अधिकारी नव्हते. दिल्लीत निती आयोगाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाली, त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यंत्री उपस्थित होते.

Shambhuraj Desai
विखेंचे संगमनेरमध्ये शक्तिप्रदर्शन : म्हणाले, नव्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला आणि माफीयांना थारा नसेल...

त्या दोघांनी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटुन १९ हजार कोटी रुपयांचे विशेष प्रस्ताव राज्य सरकारतर्फे दिले आहे. त्याचा निधी तातडीने देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे. त्यामुळे राज्याला अधिकचा निधी मिळेल. पालकमंत्री यांच्या नेमणुका झाल्या नसल्या तरी राज्यातील कोणतेही काम अथवा निर्णय थांबलेले नाही. लवकरच त्या नेमणुका होतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com