Parth Pawar : शंभूराज देसाईंना पार्थ पवार भेटले अन् चर्चांना उधाण आलं

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा
Gopichand Padalkar,Shambhuraj Desai, Parth Pawar
Gopichand Padalkar,Shambhuraj Desai, Parth PawarSarkarnama

Parth Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे (NCP) युवा नेते पार्थ पवार यांनी आज साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांची मुंबईतील पावनगड या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. पार्थ पवार यांनी अचानक शंभूराज देसाई यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, ही भेट खासगी असल्याचे सांगितले जात आहे.

Gopichand Padalkar,Shambhuraj Desai, Parth Pawar
CM : आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिले तिळगूळ, अन् गोड-गोड बोलून मागितला रिफायनरी प्रकल्प!

पार्थ पवार यांनी आज शंभूराज देसाई यांची त्यांच्या पावनगड या मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. ही भेट खासगी असून यावेळी विविध विकासकामांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. या भेटीबाबत पार्थ पवार यांनी काहीही भाष्य केले नाही. त्यातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली आहे.

Gopichand Padalkar,Shambhuraj Desai, Parth Pawar
Marathwada Teacher Constituency : उमेदवार चौदा, पण चर्चा काळे, पाटील, सोळुंकेंचीच..

गोपीचंद पडळकर म्हणाले, ''पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी. रोहित पवार हे आमदार झाले. बारामती अॅग्रोही त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही झाले आहेत. आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थची असेल'', असं गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे पार्थ पवार आणि शंभूराज देसाई यांच्या भेटीनर बोलताना म्हणाले.

Gopichand Padalkar,Shambhuraj Desai, Parth Pawar
Shahajibapu Patil : बारामतीच्या कृषिप्रदर्शनाची शहाजीबापूंना भुरळ : म्हणाले, "सांगोल्याचा डाग पुसून.."

''तसेच हक्काच्या मतदारसंघात अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत झालाचे शल्य पार्थ पवारांच्या मनात आहे. त्यामुळेच ही भेट झाली असावी. पार्थ पवार यांनाही राजकारणात स्थिर व्हायचे असेल. पण भेट का घेतली? काय चर्चा झाली हे मला माहीत नाही'', असं गोपीचंद पडळकरांनी या भेटीवर भाष्य केलं आहे. दरम्यान, पार्थ पवार (Parth Pawar) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com