Shambhuraj Desai : मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी निधीसाठीच

उत्पादनशुल्क मंत्री शंभुराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiSarkarnama

अरुण नवथर

Shambhuraj Desai : राज्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जातात. नीती आयोगाच्या बैठकीत त्यांनी राज्यासाठी 19 हजार कोटी रुपयांची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. मागील मुख्यमंत्री दिल्ली तर सोडाच, पण मुंबईत असलेल्या मंत्रालयात देखील जात नव्हते, अशी टीका उत्पादनशुल्क मंत्री शंभुराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी आयोजित केलेल्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. नक्षत्र लॉन्समध्ये आयोजित मेळाव्याला शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिंदे गटाचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते आदी उपस्थित होते.

Shambhuraj Desai
खेवरेंचे खासदार लोखंडे यांना आव्हान : हिंमत असेल तर नगर जिल्ह्याच्या उत्तरेत बैठका घ्या...

देसाई म्हणाले, की मुंबईत आता शिवसेना पक्षप्रमुखांना गटप्रमुखांचे मेळावे घ्यावे लागत आहेत. आधी पक्षातील मोठ्या-मोठ्या नेत्यांना यांची भेट मिळत नव्हती. आता ‘मातोश्री’चे दरवाजे 24 तास उघडे असल्याचे ते सांगतात. हे आम्ही अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो, परंतु तेव्हा त्यांनी आमचे ऐकले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सुरतला नेले नाही, तर या 40 आमदारांनीच त्यांना सुरतला नेले. हिंदुत्वाच्या विचारांशी प्रामाणिक असलेल्या शिंदे यांच्या खांद्यावर 40 आमदारांनी विश्‍वासाने डोके ठेवले. त्यांचा खांदा मजबूत असून, महाराष्ट्राला विकासात ते पुढे नेतील, असा विश्‍वास मंत्री देसाई यांनी व्यक्त केला.

Shambhuraj Desai
विलासकाकांकडुन गुळाची ढेप मिळालीच नाही : शंभुराज देसाई 

शिवसेना चौथ्या क्रमांकावर

मी राज्यमंत्री असताना माझी व अन्य शिवसेना आमदारांचीही कामे होत नव्हती. (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करीत उद्धव ठाकरे यांनी सत्तापद घेतले. त्याचा परिणाम त्यावेळच्या नगरपालिकांच्या निवडणुकांत दिसून आला. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री, तो पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला असल्याचे देसाई म्हणाले.

निधी कमी पडू देणार नाही

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे व भाजप युतीला मिळालेले यश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहावे. तसेच आत्मपरीक्षण करावे. नगर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नसला, तरी जिल्ह्याची विकासकामे प्रलंबित राहणार नाहीत. नगर शहरातील रस्त्यांसह निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही देसाई यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in