शंभूराज देसाईंनी पाटणची निवडणूक टाळली... नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

शिवसेनेच्या Shivsena देसाई Desai group supporters गटाकडून उपनगराध्यक्ष पदासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने व नगराध्यक्षपदाच्या Mayor आरक्षणाची नगरसेविका नसल्याने कोणाचाही अर्ज दाखल झाला नाही.
Satyajit Patankar, Patan Mayor
Satyajit Patankar, Patan MayorSYSTEM

पाटण : पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंगल कांबळे यांची व उपनगराध्यक्षपदी सागर पोतदार यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेच्या देसाई गटाकडून उपनगराध्यक्ष पदासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने व नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची नगरसेविका नसल्याने कोणाचाही अर्ज दाखल झाला नाही. नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. अनिता देवकांत व मंगल कांबळे या दोन नगरसेविकांचे अर्ज दाखल झाले. अंतिम क्षणी अनिता देवकांत यांनी माघार घेतली. त्यामुळे मंगल कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.

निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत विजय साजरा केला. पाटणचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीतील महिलेसाठी आरक्षित आहे. अनिता देवकांत व मंगल कांबळे या दोन नगरसेविकांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अंतिम क्षणी अनिता देवकांत यांनी माघार घेतली. त्यामुळे मंगल कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.

Satyajit Patankar, Patan Mayor
पाटणच्या जनतेसाठी मंत्री शंभूराज देसाई घेणार 'जनता दरबार'

उपनगराध्यक्षपदासाठी सागर पोतदार यांचा अर्ज दाखल झाला. विरोधी शिवसेनेच्या देसाई गटाकडून उपनगराध्यक्ष पदासाठी पुरेशे संख्याबळ नसल्याने व नगराध्यक्षपदासाठी असणाऱ्या आरक्षणाच्या नगरसेविका नसल्याने कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. छाननीत सागर पोतदार यांचा अर्ज वैध ठरला. त्यामुळे त्यांचीही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.

Satyajit Patankar, Patan Mayor
सत्यजित पाटणकरचं बॉस! शंभूराजेंना पाणी पाजत राष्ट्रवादीने राखला गड

युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी नूतन पदाधिकाऱ्याचा नगरपंचायतीत येऊन सत्कार केला. नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, बाजार समितीच्या सभापती रेखाताई पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com