Satara News : शंभूराज देसाईंनी मागितली टोलनाका कंपन्यांवरील गुन्ह्यांची माहिती

Shambhuraj Desai टोलच्या अनियमिततेबाबत होणाऱ्या अडचणीसंदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नियोजन भवनात जिल्हास्तरीय अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisarkarnama

Satara News : आनेवाडी व तासवडे टोल नाका चालविणाऱ्या कंपन्यांवर कोणते व किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती पोलिस विभागाने सादर करावी. टोल नाक्यावरील सीसीटिव्हीची जोडणी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस अधिक्षक कार्यालयांना देण्याची व्यवस्था आठ दिवसांत करावी, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी व तासवडे टोल नाक्यावर toll plaza स्थानिक नागरिकांना टोलच्या अनियमिततेबाबत होणाऱ्या अडचणीसंदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी नियोजन भवनात जिल्हास्तरीय अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समिर शेख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, टोल प्लाझाचे व्यवस्थापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Shambhuraj Desai
Satara NCP News : राष्ट्रवादी अंतर्गत मतभेद; औद्योगिक सेलच्या जिल्हाध्यक्षाचा राजीनामा

श्री. देसाई म्हणाले, टोल नाका चालविणाऱ्या कंपन्यांवर कोणकोणते व किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती पोलीस विभागाने सादर करावी. टोल नाक्यावरील सीसीटिव्हींची जोडणी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालय यांना देण्याची व्यवस्था आठ दिवसात करावी.

Shambhuraj Desai
BJP Vs Shinde Group : भाजप-शिंदे गटात वादाची ठिगणी : ‘आम्हाला सन्मान मिळत नाही, सापत्न वागणूक मिळते’; खासदारांचा हल्लाबोल

जेणेकरुन टोल नाक्यावरील प्रत्येक हालचालींवर सतत देखरेख ठेवता येईल. तसेच येथे होणाऱ्या गंभीर घटनांच्या बाबतीत तात्काळ कार्यवाही करता येईल. आनेवाडी व तासवडे टोल नाक्यावर टोलच्या अनियमिततेबाबत स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने तक्रारींचा अहवाल सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Shambhuraj Desai
Devednra Fadanvis यांनी महाविकास आघाडीला चांगलचं धुतलं | MVA | Ahmednagar BJP Melava | Sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com