Shambhuraj Desai : "उद्धव ठाकरेंना मिळमिळीत बोलण्याची सवय म्हणून..." ; मंत्री देसाईंची टिका!

Shambhuraj Desai : राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही.
Udhav Thackeray, Shambhuraj Desai
Udhav Thackeray, Shambhuraj Desaisarkarnama

कऱ्हाड : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक इंचही महाराष्ट्रातील जमीन कर्नाटकात जाणार नाही, असे सांगीतले आहे. आता हे मिळमिळीत उत्तर आहे का? उध्दव ठाकरे यांना नेहमी मिळमिळीत बोलायची सवय आहे, त्यामुळे त्यांना हे उत्तर मिळमिळीत वाटत असेल, अशी टिका राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी केली.

मुख्यमंत्री शिंदे आज (ता.२५) कऱ्हाड दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी मंत्री देसाई आज कऱ्हाड येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या उच्चस्तरीय समितीची बांधणी करण्यात आली असून, त्याची व्याप्ती वाढवली आहे. त्यामध्ये नवीन सदस्यांची नेमणुका करण्यात आली आहे. तातडीने समितीची बैठकही घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि माझ्यावर समन्वयाची जबाबदारी दिली आहे. दुसऱ्याच दिवशी आमचे काम सुरु झाले.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
लग्नाच्या पाचव्या दिवशीच तिचं कुंकू पुसलं ..; मंडपातच त्याचा मृतदेह ठेवण्याची वेळ!

राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही असहमत :

राज्यपालांच्या वक्तव्याबद्दल आम्ही बिलकुल सहमत नाही. त्याबद्दल आम्ही, मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानचे आदर्श आहेत. ते हजारो वर्ष आदर्श राहतील. महाराजांबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला आदर आहे. राज्यपालांचे वक्तव्य आले आहे, त्यावर आम्ही बिल्कुल सहमत नाही. त्यावर आमच्या पक्षाचे वरिष्ठ मंडळी भूमिका काय घ्यायची हे ठरवतील. महाराष्ट्रातील जनता अशा प्रकारचे वक्तव्य सहन करणार नाही.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
Ravikant Tupkar : तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनाचे यश : शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य!

कर्नाटकचे चॅनेल महाराष्ट्रातील बातम्या दाखवत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील माध्यमांना माझी हात जोडून विनंती आहे की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याना एवढे महत्व देण्याची गरज नाही. त्यांना काही महत्व देण्याची गरज नाही, असेही देसाई म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com