शंभूराज देसाईंनीही महेश शिंदेंनाच विचारले, शिवसेना सोडणार आहात का?

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai म्हणाले, ''आमदार महेश शिंदेंबाबत Mahesh Shinde भाजप BJP संपर्काच्या काही लोकांकडून अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.
शंभूराज देसाईंनीही महेश शिंदेंनाच विचारले, शिवसेना सोडणार आहात का?
Mahesh shinde, shambhuraj desaisarkarnama

सातारा : आमदार महेश शिंदे यांनी गेल्या आठवडाभरापासून रयत शिक्षण संस्था व शरद पवारांविषयी वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. तर दुसरीकडे ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे. याविषयी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र, ही चर्चा केवळ अफवा असून महाविकास आघाडी सरकारला हालवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनीही जाणीवपूर्व हा गैरसमज निर्माण केल्याचे म्हटलं आहे. तर महेश शिंदेंनी ही सर्व चुकीचे आहे, मी शिवसेनेतून उभा होतो, शिवसेनचा आमदार आहे. मी पवार साहेबांवर टीका केलेली नाही, असे स्पष्ट केले आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ''आमदार महेश शिंदेंबाबत भाजप संपर्काच्या काहींकडून अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. ते शिवसेनेचे विधीमंडळातील मान्यवर सदस्य असून त्यांचा पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी दुसऱ्या संदर्भाने याबाबतचे वक्तव्य केले असेल. त्याचा संदर्भ जोडून शिवसेनेचे आमदार नाराज आहेत, असे जाणीव पूर्वक पसरविणे व पेरण्याचे काम ज्यांना महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गेली दोन वर्षे प्रभावीपणे करत आहे, हे पहावत नाही.

Mahesh shinde, shambhuraj desai
शंभूराज देसाई म्हणतात, आगामी निवडणुकीतच विरोधकांना 'ट्रेलर' दाखवतो...

त्या लोकांनी अनेकवेळा या महाविकास आघाडी सरकारला धक्का लावण्याचा प्रयत्न केला. पण, इंचभर देखील सरकार हालले नाही. अशा प्रवृत्तीचे लोक जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात महेश शिंदेंशी मी बाललो आहे, त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Mahesh shinde, shambhuraj desai
आ. महेश शिंदे शिवसेनेला रामराम ठोकणार या केवळ वावड्याच...;पाहा व्हिडिओ

आमदार महेश शिंदे 'रयत'चा मुद्द्यावर बोलण्याचे नेमके काय कारण असावे, याविषयी विचारले असता शंभूराज देसाई म्हणाले, 'रयत' च्या मुद्द्यावर चर्चा झालेली नाही. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांवरून त्यांची वक्तव्ये मला कळाली आहेत. याबाबत काही आक्षेप, काही संदर्भ त्यांच्याकडे असतील तर ते त्यांनी द्यावेत. आपण ते पक्ष प्रमुखांच्या निदर्शनास आणून देऊ. त्यातून आमदार शिंदेंचे समाधान झाले नाहीत, तर आपण बसून चर्चा करू, असे ही मंत्री देसाई यांनी नमुद केले.

Mahesh shinde, shambhuraj desai
उदयनराजे अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा'वर फिदा; थिएटरमध्ये जाऊन घेतला आनंद

यासंदर्भात आमदार महेश शिंदेंकडून जाणून घेतले असता ते म्हणाले, या चर्चा चुकीच्या आहेत. मी शिवसेनेतून उभा होतो, मी शिवसेनेचा आमदार आहे. मी पवार साहेबांवर कोणतीही टीका केलेली नाही. पवार साहेबांना आवाहन करतो, तुम्ही मनात आणले तर जनता सुखी होऊ शकते. आमचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना 'रयत'चा अध्यक्ष करावे. स्वामी संस्थेलाही लाही लागू होते. मग 'रयत' आणि 'स्वामी' ही राज्याची मालमत्ता आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in