संभाजीराजेंचं नेमकं कुठं चुकलं? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवरून राजकारण तापलं
Shahu Chhatrapati
Shahu Chhatrapati Sarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. पण कोणत्याही पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी यासाठी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं बोट दाखवलं आहे. पण संभाजीराजेंचे पिता शाहू छत्रपती यांनी मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोणताही दोष दिलेले नाही. याचबरोबर मी अजूनही शिवसेनेत असल्याचं जाहीर केलं आहे. (Sambhajiraje Chhatrapati latest news updates)

शाहू छत्रपती म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना व्यक्तीगतरित्या उमेदवारी नाकारली आहे. याचा छत्रपती घराण्याशी संबंध नाही. हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय असून, छत्रपती घराण्याचा आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी सन्मान केला आहे. संभाजीराजे यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या हालचाली जानेवारीपासून सुरू होत्या. त्याचवेळी त्यांना भूमिका मांडायला वेळ होता. शेवटच्या टप्प्यात त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना कदाचित तुम्ही अपक्ष म्हणून उभे राह, आम्ही पाठिंबा देतो आणि महाविकास आघाडीचाही पाठिंबा घ्या, असा सल्ला मिळाला असेल. पण त्यात किती तथ्य आहे, हे मला माहिती नाही.

संभाजीराजेंनी फडणवीसांसोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही भेट घ्यायला हवी होती. पण त्यांनी तसं केलं नाही. संभाजीराजेंनी २००९ नंतर जे समाजकारण आणि राजकारण केलं त्याबाबत त्यांनी माझ्याशी चर्चा केली नाही. त्यांचे निर्णय हे व्यक्तीगत स्वरूपाचे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीराजेंनी भेट घेतली. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर कच्चा मसुदा तयार झाल्याचे पत्र व्हायरल होत आहे. मात्र, हा मसुदा कच्चा होता, अंतिम नव्हता. नंतर वाटाघाटी फिसकटल्याने शिवसेनेकडून कोल्हापुरातील संजय पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली.

संजय पवारांना उमेदवारी देण्याचा शिवसेनेचा निर्णय अतिशय चांगला आहे. मागील अनेक वर्ष पवार हे शिवसेनेत सक्रिय आहेत. त्यांना उमेदवारी जाहीरझाल्यानंतर मी स्वतः त्यांचे अभिनंदन केले. खासदारकी मिळवायाची असेल तर त्या पक्षाचे नियमही सोबत येतात. शिवसेनेत जायचे असेल तर शिवबंधन घालावे लागेल. हा प्रत्येक पक्षाचा निर्णय असल्यामुळं तो पाळावा लागतो.

Shahu Chhatrapati
संभाजीराजेंना अपक्ष म्हणून उभे करण्याची फडणवीस अन् भाजपची खेळी! शाहू छत्रपतींचा गौप्यस्फोट

राज्यसभेच्या (Rajya Sabha) उमेदवारीसाठी संभाजीराजेंनी शिवबंधन हाती बांधावे, असा प्रस्ताव शिवसेनेकडून त्यांच्यासमोर ठेवला होता. पण संभाजीराजेंनी त्यास नकार दिल्याने शिवसेनेने कोल्हापुरातील संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी अपक्ष न लढता माघार घेतली. कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने संभाजीराजेंना राज्यसभेसाठी पाठिंबा न दिल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. संभाजीराजेंनीही पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवलं होतं.

Shahu Chhatrapati
आर्यन खानला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न! एनसीबीनं वानखेडेंवर फोडलं खापर

संजय पवार यांनी शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर संभाजीराजेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याच्या आशाही संपुष्टात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांत संभाजीराजेंनी मराठा संघटनांच्या समन्वयकांशी चर्चा केली असल्याचे बोलले जात होते. संभाजीराजेंनी यानंतर स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राजकारण करण्याची घोषणा केली होती. तसेच, पुढील विधानसभा निवडणुका या संघटनेच्या माध्यमातून लढवण्याचे जाहीर केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com