
Shahajibapu Patil On Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. 'शिंदे गटाकडे आपण पक्ष म्हणून पाहत नाही. शिंदे गट हा भाजपाकडून पाळलेल्या कोंबड्याचा खुराडा आहे. तो काही राजकीय पक्ष नाही. या कोंबड्या कधीही कापल्या जातील,' असं बोचरं विधान राऊत यांनी केलं होतं. आता याला शिंदे गटाकडून आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
“संजय राऊत हे बारक्या खुराड्यात बसलेले आहेत. आमचा शिवसेना हा पक्ष आहे, आता तर हे निवडणूक आयोगानेच देशाला सांगितलं आहे की, आम्हीच शिवसेना आहे. ते संजय राऊत बिन बुडाचं अडगं कुणीकडही घरंगळत महाराष्ट्रात हिंडतंय, ओरडतंय आणि अरडतंय,’ याला काहीही अर्थ नाही,” अशा शब्दांत शहाजी पाटलांनी राऊतांचा जोरदार समाचार घेतला.
“संजय राऊत यांच्यासारखी लोकं देशातल्या स्वायत्त संस्थांची, लोकशाही आणि लोकांचा स्वातंत्र्यावरचा विश्वास ढासळून टाकायचं काम करतात. राऊतांची भूमिका सकाळी नुसतं टीव्हीसमोर येऊन, १५ मिनिट बोलण्याशिवाय काही नाही. त्यांनी आता राजकारणावर काही बोलू नये,” असा सल्ला शहाजी पाटलांनी राऊतांना दिला.
महाराष्ट्रात जे की सत्ता नाट्यावर ‘डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ असा एक चित्रपट काढणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हंटलं होतं. याबद्दल बोलताना शहाजीबापू म्हणाले, “नुसतं खोके-खोके म्हणत संजय राऊत हे दगडं मारत फिरणार आहेत. त्यांना कावीळ झालीये. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांसारख्या माणसाच्या हातामध्ये कोलीत दिलं आहे. त्यामुळे ‘माकडाच्या हातात कोलीत-संजय राऊत’ असा चित्रपट तुम्हाला दिसून येईल, असेही शहाजीबापू यांनी म्हंटलं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.