Shahaji Patil : शिंदे -फडणवीस सरकार कार्यकाल पूर्ण करणार...

शिवसेनेत दोन गट पडल्यावर शिंदे गटाने भाजप समवेत राज्यात सत्ता स्थापन केली आहे.
Shahaji Patil
Shahaji Patil Sarkarnama

Shahaji Patil : शिवसेनेत दोन गट पडल्यावर शिंदे गटाने भाजप समवेत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार शहाजी बापू पाटील ( Shahaji Patil ) यांनी शिंदे-फडणवीस सरकार कार्यकाल पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. भाळवणी (ता. पारनेर) येथे शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विकास रोहकले यांच्या संपर्क कार्यालयास आमदार पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, शिंदे -फडणवीस सरकार हे उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार असून यात कोणती शंका नसल्याचे सांगत या सरकारच्या काळात राज्य प्रगतीपथावर जाणार असून जनतेची खंबीर साथ असल्याने आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळणार असल्याचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.

Shahaji Patil
Shahaji Patil : मला वाटतंय मिटकरींनी संजय राऊतांना गुरू मानलंय... शहाजी बापूंचा टोला

पाटील म्हणाले, पारनेर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीचा पाणी प्रश्न सारखाच असून पाणी प्रश्नावर मागणी करणारे नेतृत्व कमी पडल्याने हा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबितच आहे. पारनेरच्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाचे गाऱ्हाणे राज्य सरकारकडे मांडणार आहोत.

Shahaji Patil
चंद्रकांत खैरे राहतात औरंगाबादला आणि गोळ्या मारतात ढगात : शहाजी पाटलांची टीका

तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांच्यात प्रभावी नेतृत्व क्षमता असून सर्वसामान्य जनतेसाठी त्यांचे काम चांगले आहे आगामी काळात रोहोकले यांना राज्य सरकारच्या माध्यमातून व आपण स्वतःही मोठी ताकद निर्माण करून देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com