एकदम Ok : शहाजी बापू म्हणाले, जयाभाऊच भावी मंत्री...

बैलगाडी शौकिनांनी Bullock cart enthusiasts आमदार पाटील Shahaji Patil यांना डायलॉग dialogue म्हणण्याची जोरदार मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत आमदार पाटील यांनी डायलॉगबाजी केली.
Shahaji Patil, Jaykumar Gore
Shahaji Patil, Jaykumar Goresarkarnama

दहिवडी : जयाभाऊच भावी मंत्री, एकदम ओक्के...असे म्हणत आमदार शहाजी बापू पाटील यांनी विरकरवाडी येथे चौफेर टोलेबाजी केली. यावर आमदार जयकुमार गोरे यांनी हसून प्रतिसाद देताच शहाजी बापूंनी हुतंय, हुतंय म्हणताच एकच हशा पिकला.

विरकरवाडी (ता. माण) येथे मंगळवारी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडी शर्यतीचा बक्षीस समारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे व आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Shahaji Patil, Jaykumar Gore
Satara : सातारा लोकसभेतून भाजपचाच खासदार निवडून येणार.. जयकुमार गोरे

यावेळी उपस्थित बैलगाडी शौकिनांनी आमदार पाटील यांना डायलॉग म्हणण्याची जोरदार मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत आमदार पाटील यांनी डायलॉगबाजी केली. ते म्हणाले, शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यावर उपस्थितांनी ओक्के.. म्हणत प्रतिसाद दिला. नंतर फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री, ओक्के... असे प्रतिउत्तर दिले. त्याला जोडूनच ते जयाभाऊ भावी मंत्री... म्हणताच उपस्थितांनी एकदम ओक्के... म्हणत जोरदार प्रतिसाद दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in