Shahaji Bapu Patil: आमदार शहाजी बापू अडचणीत; मतदारसंघातील ४५ सरपंचांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

Sangola constituency: ...तर जिल्हा परिषदेला टाळे ठोकण्याचा दिला इशारा
Shahaji Bapu Patil
Shahaji Bapu PatilSarkarnama

Solapur News : सांगोला मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील त्यांच्या काय झाडी काय डोंगर या डायलॉगमुळे एका रात्रीत प्रकाशझोतात आले. त्यानंतर महाराष्ट्रातच नाहीतर जगभरात बापूंचे चाहते निर्माण झाले आहेत. तसेच शिंदे गटातील प्रमुख नेत्यांमध्ये बापूंनी स्थान मिळवलं. पण आता हेच बापू अडचणीत आले आहेत.

शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघातील तब्बल 45 ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी सोलापूर येथे बेमुदत उपोषणाचं अस्त्र उपसलं आहे. शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असलेल्या ग्रामपंचातींची विकास कामे राजकीय दबावापोटी प्रलंबित करण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप सरपंचांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख, चंद्रकांत देशमुख आणि बाबा करांडे यांच्यासह जवळपास शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते सांगोल्याहून सोलापुरमध्ये उपोषणात सहभागी होण्यासाठी आले आहेत.

Shahaji Bapu Patil
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा डंका अमेरिकेतही ; टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकले बॅनर

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याविरोधात सोलापूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून बेमुदत उपोषण केलं जात आहे. शेकापच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद सीईओना याबाबत निवेदन दिले होते.

निवेदन देऊन पंधरा दिवस लोटले तरी कोणतीच कारवाई न झाल्याने आजपासून बेमुदत उपोषण करत आहोत. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. जलजीवन मिशन मधील कामात भ्रष्टाचार केला जातोय. त्यामुळे याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे.

मतदारसंघातील अनेक कामे झालीच नाहीत. मात्र, त्याची बिले उचलली गेलीत त्याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. आमचे आमदार शहाजी बापूंना आमचे आव्हान आहे त्यांनी याबाबत खुलासा करावा. संबंधित निधी वाटपातील अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न केल्यास जिल्हा परिषदेला टाळे ठोकणार असल्याचा इशारा शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Shahaji Bapu Patil
Ramdas Athawale News :..अन् रामदास आठवलेंच्या शायरीने राज्यसभेत पिकला हशा; नेमकी काय घडलं?

शेकाप पक्षाच्या 45 गावातील सरपंचांनी काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांचीही भेट घेतली होती. यावेळी त्यांनी दलित वस्ती सुधारणासाठी निधी मिळत नसल्याने 45 गावांचा विकास थांबला आहे.

गावांमधील दलित वस्तीच्या सुधाराणांसाठी जिल्हा प्रशासनाकडून समान निधी मिळत नाही. तसेच ग्रामपंचायतींनी केलेला ठराव आमदार ग्राह्य धरत नाहीत असा शहाजी बापूंविरोधातील तक्रारींचा पाढाच यावेळी सरपंचांनी प्रशासकीय अधिकार्यांसमोर वाचला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com