काय शिकवलयं की नाय या पोराला? शहाजीबापूंची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका

Aditya Thackeray| Shahaji Bapu Patil| आदित्य शिंदे गटातील आमदारांवर गद्दार असल्याचा आरोप करत आहेत.
Aditya Thackeray|
Aditya Thackeray|

सांगोला : ''आदित्य ठाकरे यांच्यावर काही संस्कार केले आहेत की नाही? की लहानपणी ते गल्लीबोळात फिरत होते,'' अशी खरमरीत प्रतिक्रिया शिंदे गटातील बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) केली आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे आदित्य ठाकरे राज्यभरात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. जाहीर सभांमधून बंडखोरांना सातत्यांने लक्ष्य केले जात आहे. आदित्य शिंदे गटातील आमदारांवर गद्दार असल्याचा आरोप करत आहेत. ही टीका आता शहाजी बापू पाटील यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“ आमची गद्दारी नाही तर आम्ही खुद्दारी आहे. उद्धव ठाकरे काही बोलले तर त्यांचे शब्द आमदारांच्या जिव्हारी लागणार नाही. पण आदित्य ठाकरेंसारख्या लहान पोराने असे बोलणं चुकीचं आहे. इथं प्रत्ये आमदारांचे वय कोणाच ५०, कोणाचं ६०, कोणी ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे. आपण आपल्या घरात वडीलधाऱ्यांना आदराने, सन्मानाने बोलतो. हा संस्कार आपल्याला आईने लहाणपणीच दिलेला असतो. पण या पोराला काय शिकवलंय की नाही हे समजत नाही. हे पोरगं बाहेर गल्लीत हिंडत होतं, हेही समजत नाही,” अशा शब्दांत शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

Aditya Thackeray|
राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी; भाऊ सुनील राऊत म्हणाले...

“आदित्य ठाकरेंना अशी भाषा अजिबात शोभत नाही. ठाकरी भाषा फक्त दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनाच शोभत होती. पण आता अशा भाषा उद्धव ठाकरेंचींही नाही आणि आदित्य ठाकरेंचीही नाही. कुठल्याही नेतृत्वाने जनतेसमोर जाताना आपले उपजत गुण घेऊन जावे. कोणाचं अनुकरण नको. अनुकरण करणारे नेतृत्व टिकलेले नाही आणि ते लोकांना आवडतही नाही. तुम्हाला बाळासाहेबांचा वारसा आहे. त्यामुळे तुम्हाला हा सन्मान मिळाला आहे,” असा टोलाही शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंना लगावला

“दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू म्हणून आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत आहेत. पण ते लोकांचे नेतृत्व म्हणून फिरत नाहीत. ठाकरे नावाचे लेबल त्यांच्यापासून बाजूला केले, तर त्यांच्या सभेला ५० लोकही जमणे कठीण आहे. एकीकडे आम्हाला गद्दार म्हणतात आणि दुसरीकडे या-या पण म्हणत आहेत. आता कशाला हवे आहोत आम्ही. आमची अजिबात वाट पाहू नका. आम्हाला गद्दार म्हणून नका, आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबाचा आणि मातोश्रीचा सन्मान राखतो,” अशा शब्दांत शहाजीबापूंनी आदित्य ठाकरेंना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com