Satara : ज्येष्ठ विधीज्ञ कॉ. धैर्यशील पाटील यांचे निधन

सातारा म्युन्सिपल कामगार संघटनेचे Satara Munciple Kamgar Sanghatna त्यांनी सलग पन्नास वर्षे नेतृत्व केले. कामगारांच्या प्रश्नाचा On the issue of workers त्यांना जिव्हाळा होता.
Advct. D. V. Patil Satara
Advct. D. V. Patil Satarasarkarnama

सातारा : ज्येष्ठ विधीज्ञ कॉ. धैर्यशील पाटील उर्फ डि. व्ही पाटील (वय ७९) यांचे आज (बुधवार) सकाळी पावणे अकराच्या सुमारास अल्प आजाराने साताऱ्यातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी ॲड. दिपा पाटील, मुलगा नगरसेवक निशांत पाटील, ॲड. सिध्दार्थ पाटील, मुलगी नताशा शालगर असा परिवार आहे. ते 'दादा' या नावाने परिचित होते. आज सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्यावर संगममाहुली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ॲड. धैर्यशील पाटील हे नेर्ले (ता. वाळवा, जि. सांगली) गावचे असून १४ जुलै १९४३ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील ॲड. व्ही. एन. पाटील हे साताऱ्याचे आमदार होते. ॲड. धैर्यशील पाटील हे 'दादा' नावाने परिचित होते. त्यांनी सलग ५२ वर्षे वकिली करून विविध नामवंत खटल्यात यश मिळवत महाराष्ट्रभर नाव कमवले होते. फौजदारीचे ते निष्णात वकिल होते.

Advct. D. V. Patil Satara
छत्रपती घराण्यातील शिवाजीराजे भोसले यांचे निधन

इंडियन बार कौन्सिलचे ते अध्यक्ष होते. तसेच महाराष्ट्र, गोवा बार असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. गोवा बार असोसिएशनचा त्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. कामगार, कष्टकरी समाजासाठी ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. डाव्या विचारसरणीचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता.

Advct. D. V. Patil Satara
शंभुराज देसाईंचा सातारा जिल्ह्याचा मास्टर प्लॅन ठरला...

साताऱ्यातील शरद लेवे खून खटल्यात त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची बाजू संभाळली होती. तसेच महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्यात ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांची बाजू त्यांनी संभाळली होती. राज्यातील अनेक महत्वाच्या खटल्यात त्यांनी कामकाज केले होते. नवीन न्यायाधीशांना मार्गदर्शनपर व्याख्याने ते देत असत, तसेच त्यांना प्रशिक्षणही देत होते.

Advct. D. V. Patil Satara
Hanumant Sathe : दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते हनुमंत साठे यांचे निधन

सातारा म्युन्सिपल कामगार संघटनेचे त्यांनी सलग पन्नास वर्षे नेतृत्व केले. कामगारांच्या प्रश्नाचा त्यांना जिव्हाळा होता. कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी अनेक आंदोलने, मोर्चे काढले. तसेच कामगारांसाठी कायदेशीर लढे ही त्यांनी उभारले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com