भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे यांचे निधन

श्री. देशपांडे १९९० च्या दशकातील आक्रमक नेते म्हणून सातारा जिल्ह्याला परिचित होते. आक्रमक नगरसेवक म्हणूनही त्यांनी १९९० चा कालवधी कराड पालिकेत गाजवला होता.
Rajabhau Deshpande
Rajabhau Deshpandekarad

कऱ्हाड : भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे (वय १००) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. नगरसेवक, भाजपचे संघटक म्हणून राजाभाऊ यांचा पक्षात दरारा होता. त्यांनी वयाची शंभरी पार केल्याबद्दल देशपांडे यांचा केंद्रीय अवजड रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी २६ सप्टेंबर रोजी सत्कार केला होता.

श्री. देशपांडे १९९० च्या दशकातील आक्रमक नेते म्हणून सातारा जिल्ह्याला परिचित होते. आक्रमक नगरसेवक म्हणूनही त्यांनी १९९० चा कालवधी कराड पालिकेत गाजवला होता. पालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी चांगले काम केले. ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या कालवधीत ते आक्रमक विरोधी नगरसेवकाच्या भूमिकेत सातत्याने चर्चेत राहिले होते. मात्र, अलीकडे अनेक वर्षापासून श्री. देशपांडे राजकारणापासून अलिप्त राहिले होते.

Rajabhau Deshpande
शिवसेना-भाजप २०२४ च्या निवडणुकीत एकत्र येतील

त्यांचे मुळगाव कऱ्हाड तालुक्यातील करवडी आहे. भाजपमध्ये त्यांच्या शब्दाला वजन होते. त्यांचे भाजपमधील योगदान लक्षात घेऊन अनेक नेते त्यांना आदर्श मानतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्यंतरी कार्यक्रमानिमित्त कराड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी आवर्जून ज्येष्ठ नेते देशपांडे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीत दोघांनी पक्षातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. मंत्री गडकरी यांनी राजाभाऊ देशपांडे यांचा 100 पेढ्यांचा हार घालून सत्कार केला होता. तो त्यांचा अंतिम कार्यक्रम ठरला. वृद्धपकाळाने त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

Rajabhau Deshpande
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, शरद पवार व नितीन गडकरी दोघे ज्योतीमान तारे...

देशपांडे यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (शनिवारी) करवडी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. देशपांडे यांचे पार्थिव उद्या त्यांच्या कराड निवासस्थानी सकाळी सात ते नऊ या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. नऊ ते दहा या वेळेत त्यांची अंतयात्रा कराड शहरातून काढली जाणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव करवडी येथे नेण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com