शहाजीबापू पाटलांचा विधानसभेच्या मैदानातून पळ? विधान परिषदेवर पाठविण्यासाठी भाजप नेत्याला साकडे

शेकापचे पुढील काळातील मोठे आव्हान पाहूनच शहाजीबापू पाटील यांनी विधानसभेच्या मैदानातून पळ काढल्याची चर्चा त्यांच्या विधानानंतर सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे.
Shahajibapu Patil
Shahajibapu PatilSarkarnama

पंढरपूर : ‘काय झाडी, काय डोंगार’फेम बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी आपल्याला चक्क विधान परिषदेवर (Legislative Council) पाठविण्याचे साकडे भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना घातले आहे. आमदार पाटील यांच्या मागणीनंतर शिंदे गटात व सांगोला मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे. (Send me to Legislative Council: MLA Shahajibapu Patil's request to BJP leader)

शेकापचे पुढील काळातील मोठे आव्हान पाहूनच शहाजीबापू पाटील यांनी विधानसभेच्या मैदानातून पळ काढल्याची चर्चा त्यांच्या विधानानंतर सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे. हे सांगताना त्यांनी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना सांगोल्यातून आमदार करण्याची गळ घातली आहे.

Shahajibapu Patil
राज ठाकरेंच्या भेटीचे कारण खुद्द मुख्यमंत्री शिंदेंनीच सांगितले...

सांगोल्याचे दिवगंत शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्याकडून सतत पराभव स्वीकारणारे शहाजी पाटील हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करुन अवघ्या काही मतांच्या फरकाने सांगोल्यातून शिवसेनेकडून निवडून आले आहेत. पुढच्या निवडणुकीत शेकापचे आव्हान मोठे राहणार याची जाणीव झाल्यानेच आमदार शहाजी पाटील यांनी आता विधानसभेऐवजी विधान परिषदेवर पाठवण्याची विनंती भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे.

Shahajibapu Patil
राज्यातील हजारो मराठी शाळा बंद करण्याचा ईडी सरकारचा घाट : अजित पवारांचा आरोप

सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्या सारखं विधान परिषदेवर पाठवा अशी जाहीर मागणी आमदार पाटील यांनी भाजप नेते दरेकर यांच्याकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Shahajibapu Patil
जामनेरच्या ‘त्या’ पोलिसाच्या माध्यमातून माझ्या अटकेसाठी षडयंत्र रचलं जातंय : खडसेंचा गौप्यस्फोट

पंढरपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना आमदार शहाजी पाटील यांनी ही मागणी केली आहे. काय झाडी, काय डोंगर या डायलाॅगमुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत चर्चेत आलेल्या आमदार शहाजी पाटील यांनी विधानसभा निवडणूक रणांगणातून आताच पळ काढलाय की काय? अशी टीका विरोधकांकडून केली‌ जाऊ लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com