कोनशिला पाहून अजित दादांनी लावला कपाळाला हात

ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) व त्यांचे कुटूंबीय हे वाचन संस्कृती जोपासणारे मानले जातात.
कोनशिला पाहून अजित दादांनी लावला कपाळाला हात
अजित पवारसरकारनामा

अहमदनगर : ज्येष्ठ नेते शरद पवार व त्यांचे कुटूंबीय हे वाचन संस्कृती जोपासणारे मानले जातात. हातात आलेल्या अथवा समोर आलेली माहिती पवार कुटूंबीय बारकाईने वाचतात. याचा प्रत्यय आज पारनेरचे आमदार नीलेश लंके व त्यांच्या कार्यकर्त्यांना आला. Seeing the cornerstone, Ajit Dada put his hand on his forehead

पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत निळोबाराय यांच्या अभंगगाथा व त्यांच्या राहत्या वाड्याचा जीर्णोद्धार कामाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व महाविकास आघाडीतील नेत्यांच्या उपस्थितीत ठेवण्यात आला होता. हा कार्यक्रम आमदार नीलेश लंके यांनी आयोजित केला होता. जीर्णोद्धार कामाच्या प्रारंभासाठी एक कोनशिला ही थाटात तयार करण्यात आली. मात्र या कोनशिलेत अहमदनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव चुकीचे कोरण्यात आले होते. 'मुश्रीफ' ऐवजी 'मुस्त्रीफ' असे लिहिण्यात आले होते.

अजित पवार
अजित पवार आले म्हणून अण्णा हजारे कार्यक्रमाला गेलेच नाहीत...

ही बाब आमदार लंके यांच्या कार्यकर्त्यांच्या एक दिवस आधीच लक्षात आली होती. मात्र काय करणार? ऐन वेळी कोनशिला बदलून मिळणेही शक्य नव्हते अथवा एवढ्या गडबडीत कोण पाहतो असे वाटल्यामुळे म्हणा. कोनशिला तशीच ठेवण्यात आली.

आज कार्यक्रमाच्या वेळी अजित पवारांनी कोनशिलेचे उद्धाटन केले. नेहमी प्रमाणे समोर आलेला मजकूर त्यांनी भराभर वाचला आणि कपाळाच हात लावला. अजित पवारांनी ही बाब उपस्थितांच्या लक्षात आणून दिली आणि एकच हशा पिकला.

अजित पवार
नीलेश लंके म्हणतात, सर्वांना चीत करण्याची ताकद आमच्यात...

या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार निलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा धुरपते, निळोबाराय देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, निळोबारायांचे वंशज गोपाळ मकाशीर, सरपंच सुभाष गाजरे यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख देवस्थानचे सर्व पदाधिकारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in