बबनराव पाचपुते म्हणाले, 'साईकृपा'वर आता गडकरींचा वरदहस्त

नागवडे कारखाना निवडणुकीत काँग्रेसचे ( Congress ) ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) विरुद्ध भाजपचे ( BJP ) आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) अशी सरळ लढत आहे.
Babanrao pachpure
Babanrao pachpureSarkarnama

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) : श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे ( Congress ) ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) विरुद्ध भाजपचे ( BJP ) आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) अशी सरळ लढत आहे. हिरडगाव येथील पाचपुतेंचा साईकृपा साखर कारखाना बंद असल्याची टीका नागवडे यांच्याकडून होत आहे. या टीकेला आमदार पाचपुते यांनी उत्तर दिले आहे. Seeing that file, Babanrao Pachpute's eyes turned white

काष्टी येथे सहकार विकास मंडळाच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. त्या सभेत आमदार पाचपुते म्हणाले की, आपण अनेक वर्षे मी मंत्री राहिलो. विधानसभा सभागृहात सर्वात वरिष्ठ आमदार आहे. अनेकांचे राजकारण जवळून पाहिले, मात्र राजेंद्र नागवडे यांनी केलेला प्रताप पाहुन डोळे पांढरे झाले. माझ्या हिरडगाव येथील कारखाना बंद असल्याची चर्चा नागवडे करतात. त्यांनी ती काळजी करु नये हिरडगावचा कारखाना दोन दिवसांत सुरु होतोय. आता तुम्ही तुमची काळजी करा, तुमच्या भ्रष्टाचारामुळे नागवडे कारखान्यात सत्तांतर होणार असल्याचा इशारा आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला.

Babanrao pachpure
बबनराव पाचपुते म्हणाले, राजेंद्र नागवडे यांना पैशाची गुर्मी...

फाईल पाहुन डोळे झाले पांढरे

आमदार पाचपुते पुढे म्हणाले की, मी आजारी असल्याने कारखाना निवडणुकीतून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. केशवराव मगर व त्यांच्या सहकाऱ्यांना अगोदर तसेच सांगितले होते. मात्र त्यांनी कारखान्यात सुरु असणाऱ्या राजेंद्र नागवडे यांच्या घोटाळ्यांची फाईल पुढे ठेवली व ती वाचून माझेही डोळे पांढरे झाले. त्यानंतर कारखाना व पर्यायाने सभासदांना वाचविण्यासाठी आपण निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला.

काळजी करु नका दोन दिवसांत साईकृपा कारखाना सुरु होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी मदत केली आहे. मला ते मदत करीत असल्याचे खुद्द शरद पवार यांनाही सांगितल्याने आता सगळ्या अडचणी मिटल्या आहेत. आमची काळजी करु नका, तुम्ही केलेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश होईल व त्याची चौकशी लागेल. त्यावेळी तुमची काय गत होईल याची काळजी करा, असा इशाराही पाचपुते यांनी नागवडे यांना दिला.

Babanrao pachpure
नागवडे पाचपुतेंना म्हणाले, 'तुम्ही' आमच्यामुळेच आमदार...

उमेदवार प्रतिभा पाचपुते म्हणाल्या, बबनराव पाचपुते माझ्यामुळे आमदार झाल्याचे राजेंद्र नागवडे सांगत आहेत. त्यांनी तारतम्य ठेवून बोलावे. त्यांचा एवढा पायगुण चांगला होता की आमचे मताधिक्य चार हजारांवर आले. त्यांच्यामुळे आम्ही आमदार झालो तर त्यांच्याच वांगदरी गावात आम्ही मागे का राहिलो, याचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे. सहकारी कारखाना वाचविण्यासाठी आमची ही लढाई सुरु असून त्यात आम्हाला यश येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी केशवराव मगर, भगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, दादा फराटे, सुवर्णा पाचपुते, संदीप नागवडे आदींच्या भाषणे झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com