मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; चंद्रकांत पाटलांनी बोलले तसे वागावे...शंभूराज देसाई

मंत्री देसाई Shambhuraj Desai म्हणाले, कोल्हापूर उत्तरच्या Kolhapur North पोटनिवडणुकीतील Byelection काँग्रेसच्या Congress श्रीमती जयश्रीताई जाधव Jayshree Jadhav यांचा विजय हा महाविकास आघाडीचा Mahavikas Aghadis विजय आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; चंद्रकांत पाटलांनी बोलले तसे वागावे...शंभूराज देसाई
Shambhuraj Desaisarkarnama

कऱ्हाड : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या श्रीमती जयश्रीताई जाधव यांचा विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शांत, संयमी आणि दुरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वावर कोल्हापुरच्या निकालातुन शिक्कामोर्तब झाले आहे. मी जाधव ताईंचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिली.

कोल्हापूरच्या ज्योतिबाचे दर्शन घेवुन साताऱ्याकडे रवाना होण्यापूर्वी मंत्री देसाई काहीकाळ कराड येथील विश्रामगृहात थांबले होते. यावेळी कोल्हापूरच्या निकालावर त्यांनी भाष्य केले. मंत्री देसाई म्हणाले, ''कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या श्रीमती जयश्रीताई जाधव यांचा विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. त्याचे श्रेय कोल्हापूरच्या जनतेला आणि महाविकास आघाडीसाठी मतदान केलेल्या मतदारांना आहे.''

Shambhuraj Desai
शिवसेना-मनसे वाद पेटला : 'काल, आज आणि उद्या' पुन्हा व्हायरल

''महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शांत, संयमी आणि दुरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वावर कोल्हापुरच्या निकालातुन झाले आहे. मी जाधव ताईंचे अभिनंदन करतो.'' भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले, ''भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधील कोणतीही निवडणुक लागली किंवा कोणत्याही आमदाराने राजीनामा दिल्यास तर तेथुन भाजपचेचा उमेदवार किंवा ते स्वतः निवडुन येतील असे सांगितले होते. बोललल्या प्रमाणे त्यांनी आता वागणे गरजेचे आहे. त्यांना बोललेल्या वक्तव्यावर कृती करण्याची वेळ आलेली आहे.''

Shambhuraj Desai
उद्धव ठाकरे २ वर्षांनंतर मंत्रालयात! शरद पवार म्हणाले, "आले का, अरे व्वा"!

ज्योतिबा यात्रेसंदर्भात ते म्हणाले, ''कोविडनंतर तिसऱ्या वर्षी जोतीबाची यात्रा उत्साहात संपन्न झाली. मानाच्या सासन काठयांचे पुजन. भाविकांत मोठा उत्साह होता. पालखी सोहळा झाला. पोलिसांनी पुर्ण खबरदारी घेतली आहे. पुरेसा बंदोबस्त आहे. पोलिस अधिक्षक व अन्य अधिकारी तेथे आहेत. त्यामुळे शांततेत यात्रा पार पडेल, यात शंका नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.