Satara : सावंतांचे विधान चुकीचेच; 'महाविकास'च्या काळातच मराठ्यांचे आरक्षण हिरावले...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis आणि मुखमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde हे आरक्षण Maratha Reservation पुन्हा मिळवुन देतील, असा विश्वासआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
MLA Shivendraraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosalesarkarnama

सातारा : मंत्र्यांनी मराठा समाजाच्या लोकभावना लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यांच्याविषयी असे विधान करणे बरोबर नाही. महाविकास आघाडीच्या काळातच मराठ्यांचे आरक्षण हिरावले गेले. आता लवकरच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे आरक्षण पुन्हा मिळवून देतील, असा विश्वास भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.

शिंदे गटाचे नेते व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. याविषयी सातारा-जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भावना जाणून घेतल्या.

MLA Shivendraraje Bhosale
जावळीतील प्रतापगड कारखाना 'अजिंक्यतारा' चालविणार.... शिवेंद्रसिंहराजे

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मंत्र्यांनी मराठा समाजाच्या लोकभावना लक्षात घेतल्या पाहिजेत. असं विधान करणं बरोबर नाही. मुळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठ्यांच आरक्षण हिरावलं गेले. मात्र, लवकरच मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुखमंत्री एकनाथ शिंदे हे आरक्षण पुन्हा मिळवुन देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in